डॉ. आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाचे वर्ष 1990! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सोलापूर : राज्यभर आज विद्यार्थी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमासाठी महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांनी शहरातील शाळांसाठी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस सात नोव्हेंबर 1990 असा दाखविला आहे. प्रत्यक्षात हा दिवस सात नोव्हेंबर 1900 असा होता. मात्र, त्यात प्रशासनाधिकाऱ्यांनी चूक केली आहे. 

महापालिकेच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंके यांनी शहरातील महापालिकेच्या खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना सहा नोव्हेंबरला पत्र दिले आहे. त्या पत्रामध्ये शासनाने 27 ऑक्‍टोबरला काढलेला आदेश व एक नोव्हेंबरचे शिक्षण उपसंचालकांच्या पत्राचा संदर्भ दिला आहे. सात नोव्हेंबर 1990 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथे शाळा प्रवेश झाला. अशी सुरवात त्या परिपत्रकाची झाली आहे. यामध्ये प्रशासनाधिकाऱ्यांनी शाळा प्रवेशाचे वय चुकविले आहे. 1900 ऐवजी 1990 असा उल्लेख परिपत्रकामध्ये केला आहे.

परिपत्रकाची सुरवात चुकीची करुन त्यापुढे हा दिवस कशा पद्धतीने साजरा करावा याबाबत सूचना दिल्या आहेत. यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्या परिपत्रकाद्वारे शाळांना केल्या आहेत. शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करुन त्याचा अहवाल प्रशानाधिकाऱ्यांना सादर करण्याच्या सूचनाही त्या परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. शिक्षण विभागाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अशाप्रकारची चूक होणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 

शाळांना दुरुस्तीचे परिपत्रक दिले आहे. परिपत्रकामध्ये चूक झालेली नाही. कार्यालयात ते पत्र टाईप झाल्यानंतर कोणीतरी ते सोशल मिडियावर व्हायरल केले आहे. मात्र, शाळांना योग्य तेच परिपत्रक दिले आहे. 
- सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ

Web Title: marathi news marathi websites Dr Babasaheb Ambedkar