'ई नाम' प्रणाली शेतकरी, व्यापाऱ्यांच्या फायद्याची 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : व्यवहारात पारदर्शकता आणणे, देशात कोठेही शेतमाल खरेदी करणे. किंमतीही स्थिर राखणे, मालाची प्रतवारी निर्माण करणे, अशी या ई नाम ऑनलाईन विक्री व्यवस्थापनाची उद्दीष्ट्ये आहेत. ई नाम प्रणाली शेतकरी व व्यापाऱ्यांच्या फायद्याची आहे असे प्रतिपादन पणन मंडळाचे प्रशिक्षक सुनील भोसले यांनी केले. दरम्यान काही व्यापाऱ्यांनी याबाबत शंका व्यक्त करत निरूत्साह दाखवून कार्यशाळेतून काढता पाय घेतला. 

बाजार समितीच्यावतीने ई-नाम ऑनलाईन विक्री व्यवस्थेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. 

श्री भोसले म्हणाले, '' ई नाम मुळे सर्वच घटकांना व्यापार करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे याचा व्यापाऱ्यांनी स्विकार केला पाहिजे. 

जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे म्हणाले, '' शासनाने सुरू केलेली ही नवीन प्रणाली कोणाला अडचणीत आणणार नाही. ही प्रणाली सर्वच घटकांना बरोबर घेवून जाणारी आहे. त्यामुळे याबाबतची माहिती रितसर ऐकूण घ्यावी.'' 

गुणीदास नेमचंद म्हणाले, '' पूर्वीची यंत्रणा सक्षम आहे. याला खोडा घालून सरकार नवीन यंत्रणा कशासासाठी आणत आहे. पूर्वीच्या पध्दतीनूसार सर्वांनाच न्याय मिळत आहे.'' 

कांदा व्यापारी मनोहरलाल चूग म्हणाले, '' कांदा, बटाटा हे नाशवंत माल आहे. त्यात तो पॅकिंगमध्येही असतो. त्याची वर्गवारी नीटपणे करावी लागते. मात्र शासनाच्या नव्या यंत्रणेत त्याची वर्गवारी कशी करणार, याचाही खुलासा झाला पाहिजे.'' 

सलिम बागवान म्हणाले, '' बाजार समितीत पहाटे माल येतो. हा माल तत्काळ विक्री करावा लागतो. तेंव्हा ही यंत्रणा सुरळीत काम करणार का?'' 

गुळ व्यापारी मनाडे म्हणाले, '' गुळामध्ये प्रतवारी करावी लागते. हे काम खूपच कठिण आहे. वेगळवेगळी प्रतवारीनूसार त्याचे नमूने काढावे लागते. ग्रेडींगचे शुल्क शेतकऱ्यांना भरणे शक्‍य नाही. तसेच काही व्यापाऱ्यांना बाजार समित्या संपवायच्या आहेत. त्यामुळे याला विरोध होणार आहे.'' 

दरम्यान, अनेक व्यापाऱ्यांनी कार्यशाळा संपण्याआधीच कार्यलय सोडले. 

काटे व व्यापाऱ्यांची वादावादी 
कार्यशाळा सुरू असतानाच शेतकऱ्यांनी ऍडव्हॉन्स म्हणून दिलेली रक्कम बुडविली तर काय करणार, असा सवाल एका व्यापाऱ्याने केला. यावेळी भगवान काटे यांनी संतप्त होवून याआधी अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले आहेत. त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत व्यापाऱ्यांना धारेवर धरले.

Web Title: marathi news marathi websites kolhapur news