झाड अंगावर पडल्याने विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

हरिभाऊ दिघे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : संगमनेर तालुक्यातील साकूर येथून मोटारसायकलवर एक विद्यार्थी व दोन विद्यार्थिंनी घरी येत असतांना साकूर-जांबूत (सोनेमळा) याठिकाणी आले असता त्याच दरम्यान रस्त्याच कडेला बाभळीचे झाड कापत असताना झाड त्यांच्या अंगावर पडल्याने एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थिंनी गंभीर जखमी झाल्याची घटना आज (सोमवार) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

त्यामुळे खंदरमाळ गावावर शोककळा पसरली आहे. ऋषिकेश शशिकांत कजबे (वय १६, रा.खंदरमाळ) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश कजबे, पूजा सोमनाथ गाडेकर (वय २१) व आरती सोमनाथ गाडेकर (वय १७, दोघी रा.नांदूर) या सख्ख्या बहिणी असे हे तिघे जण साकूर याठिकाणी शिक्षण घेत आहेत. ऋषिकेश हा आपल्या मोटारसायकलीवरुन साकूर याठिकाणी शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर दुपारी तो साकूरहून या दोन्ही बहिणींना मोटारसायकलीवरुन जांबुत मार्गे घरी जात होता.

त्याच दरम्यान जांबुत शिवारातील सोनेमळा रस्त्याच्या कडेला काहीजण बाभळीचे झाड कापत होते. त्या ठिकाणाहून ऋषिकेश जात असतांना बाभळीचे झाड त्याच्या अंगावर पडले. त्यामुळे मोटारसायकलीसह हे तिघेही बाभळीच्या झाडाखाली दाबले गेले. त्यांनी आरडाओरड केला असता आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांनी बाभळीचे झाड बाजूला करत या तिघांना बाहेर काढले. पण झाडाचे वजन जास्त असल्यामुळे ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या होत्या.

औषधोपचारासाठी या दोघींना आळेफाटा (ता.जुन्नर, जि.पुणे) येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट, उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी, पो.हे.कॉ. कैलास परांडे, संतोष खैरे, किशोर लाड, विशाल कर्पे, रामनाथ कजबे, सुभाष लेंडे, गोरख लेंडे, खंदरमाळ गावच्या सरपंच वैशाली डोके, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत बाळासाहेब कजबे यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी हे करीत आहे.

Web Title: marathi news marathi websites Maharashtra News Sangamner News