अखेर भावी पोलिस उपनिरीक्षक जाणार प्रशिक्षणाला

अक्षय गुंड 
बुधवार, 27 डिसेंबर 2017

उपळाई बुद्रूक, (जिल्हा सोलापूर) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस खात्याअंतर्गत मर्यादित विभागीय पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत 828 उमेदवार पात्र होऊन देखील गृहखात्याच्या अधिकार्यांच्या उदासिन भूमिकेमुळे 'पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र होऊनही तारीख पे तारीख' या मथळ्याखाली भावी पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणापासून वंचित तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे गृहखात्यावर दुर्लक्ष हे वृत्त ता.

उपळाई बुद्रूक, (जिल्हा सोलापूर) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस खात्याअंतर्गत मर्यादित विभागीय पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत 828 उमेदवार पात्र होऊन देखील गृहखात्याच्या अधिकार्यांच्या उदासिन भूमिकेमुळे '

aschim-maharashtra/marathi-news-solapur-news-psi-qualification-86783" target="_blank">पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र होऊनही तारीख पे तारीख' या मथळ्याखाली भावी पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणापासून वंचित तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे गृहखात्यावर दुर्लक्ष हे वृत्त ता. 11 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.

'सकाळ' च्या सोलापुर, पुणे आवृत्तीसह 'ईसकाळ'वर हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. राज्य लोकसेवा आयोगांच्या वतीने 21 ऑगस्ट 2016 रोजी लेखी परीक्षा घेऊन 21 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या दरम्यान शारीरिक चाचणी व 5 मे 2017 रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. 10 ऑगस्ट 2017 रोजी नाशिक येथे प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु अपात्र उमेदवारांनी मॅटसह उच्च न्यायालयात धाव घेतल्याने 828 पात्र भावी पोलिस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. पात्र उमेदवारांच्या व्यथा 'सकाळ' ने  प्रसिद्ध केली होती.

याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेत संबंधित अधिकार्यांना याबाबत सूचना देत हजर करून घेण्याचा आदेश देण्यात आले. पोलिस महासंचालकांनी  828 पैकी 781 उमेदवारांना नाशिक येथील पोलिस अकादमी येथे 5 ते 7 जानेवारी दरम्यान हजर राहण्याचे परिपत्रक नुकेतच काढले आहे. 'सकाळ' चे पात्र उमेदवारांकडून आभार व्यक्त केले जात आहे.

Web Title: marathi news marathi websites PSI qualification Devendra Fadnavis