सांगलीत बायपास पुलाजवळ मगरींचा वावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सांगली, : कृष्णा काठावरील मगरींचा वावर नित्याचाच आहे. मात्र बायपास पुलाजवळील नाल्यात मगरीचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. या मगरीला सुरक्षितस्थळी नेण्यासाठी वनविभागासह प्राणीमित्र सज्ज झाले आहेत. त्यांना अद्याप यश आलेले नाही. 

कृष्णा नदीत मगरींचा वावर पूर्वीपासूनच आहे. मात्र काही वर्षांत बेसुमार वाळू उपशामुळे मगरींचे अधिवास नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे मगरींचे नागरी वस्तीजवळ वारंवार दर्शन होत आहे. सध्या आयर्विन पुलाजवळ मगरीचे दर्शन नित्याचे बनले आहे. मात्र बायपास पुलाजवळील नाल्यात तीन दिवसांपासून तीन ते पाच मगरींचा वावर असल्याचे नागरिकांनी प्राणीमित्रांना कळवले. त्यानंतर प्राणीमित्रांनी तातडीने वनविभागाला याबाबत कळवले. नागरी वस्तीला संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने ही मगर तातडीने सुरक्षितस्थळी नेण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. सध्या त्या परिसरात मगर पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत. सायंकाळपर्यंत यश त्याला आले नव्हते. मगरीला पकडून सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार आहे. मात्र या परिसरात मगरीचा वावर असल्याची बातमी सांगलीभर पसरली. दुपारपासून बघ्यांची गर्दी वाढली. 

मगरीला पकडण्यासाठी "ऍनिमल राहत'चे किरण नाईक, ग्रुप ऑफ ऍनिमलचे सचिन साळुंखे, दीपक शिंदे, इलियास शेख, विशाल चव्हाण, पुष्कर कागलकर, अवधूत सावंत, ऋषी घोरपडे, राहुल पवार यांची टीम कार्यरत आहेत. वनविभागाचे निरीक्षक श्री. कोळी, वनपाल मिलिंद वाघमारे, इक्‍बाल पठाण, महादेव मुळे, सुरेश लोहार, संभाजी ढवळे यांचे त्यांना सहकार्य आहे.

Web Title: marathi news marathi websites Sangli News kolhapur news