कर्‍हाड : पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांची बदली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

कर्‍हाड ः अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या येथील पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या बदलीचा वाद आज त्यांच्या झालेल्या अधिकृत बदलीने संपुष्टात आला. त्यांच्या जागी शिर्डीचे यशवंत डांगे यांची नियुक्ती झाली आहे. औंधकर यांची कोठे बदली झाली, त्याचा आदेश अद्यापही आळेला नाही. 

मुख्याधिकारी औंधकर यांच्य़ा बदलीवरून दोन महिन्यापासून येथे वाद सुरू होता. त्यांच्या विरोधात पालिकेतील नगरसेवकांसह कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. दोन वेळा झालेल्या आंदोलनातून औंधकर यांच्या बदलीचे प्रकरण चिघळले होते. शासन त्यावर ठाम निर्णय घेत नव्हते. जूनपासून त्यावर काहीही तोंडगा निघत नव्हता. औंधकर यांची बदली होवू नये, यासाठी काही लोक प्रयत्नशील होते. त्या बाबतचे निवेदनही काही लोकांनी शासनाला दिले होते. त्यामुळे त्या बदलीचा मुद्दा शासनाकडून प्रलंबित ठेवण्यात आला होता. प्रभारी म्हणून मलकापूरच्या संजवीनी दळवी यांच्याकडे त्याची जबाबदारी देण्यात आली होती. 

कामकाज सुरू असताना एकदा औंधकर हजरही झाले होते. त्या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. तेथून ते निघून गेले ते परत पालिकेत आलेच नव्हते. त्यांची बदली होणार, अशी केवळ चर्चा होती. दर आठवड्याला त्याची वेगवेगळी चर्चा नेहमी रंगत होती. आज अखेर औंधकर यांची बदली झाल्याचे निश्चीत झाले. त्यांच्या जागी शिर्डीचे यशवंत डांगे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. त्यामुळे औंधकर यांच्या बदलीचा वाद आज संपुष्टात आला आहे. नव्याने पदभार स्वीकारणार्‍या डांगे यांच्यासमोरही आथा सुशासनाचे आव्हान आहे.

Web Title: marathi news marathi websites Satara News Kolhapur News vinayak aundhkar