पाणी पुरवठा योजना रखडल्याने शेतकरी अडचणीत

agri
agri

मंगळवेढा : दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेली भोसे आणि अन्य 39 गावांची पाणी पुरवठा योजना रखडली असून भाळवणीजवळ पाईप उपलब्ध नसताना ठेकेदाराने खोदलेली चारी न बुजवल्याने शेतक-यांना जमीन पडकी ठेवण्याची वेळ आली.

महारष्ट्र जीवन प्राधिकरणयोजने अंतर्गत आमदार भारत भालके यांनी आघाडी सरकारच्या काळात मंजूर करुन घेतली भीमा नदीच्या उचेठान बंधारयातून पाइपद्वारे पाणी उचलून ते जुनोनी येथे जल शुद्धिकरण केंद्र, सोळा गावातील उंच साठवण टाक्या उभारणे, चेन लिंक फेंसिंग पूर्ण पाईपलाईन निवासस्थान विद्युत संयोजन या कामी शासनाने 65 कोटी 29 लाख 64 हजार रु इतका निधी मंजूर केला.

6 डिसेंबर 2014 ला या योजनेचा शुभारंभ झाला आहे आज या योजनेचे कामाला सुरुवात करुन दोन वर्षे पूर्ण झाली तरीही काम पूर्ण झाले नाही. एखादी योजना पूर्ण करण्यासाठी किती काळ जनतेने वाट पहावी याचे सीमोल्लंघन झाले आहे.

नंदेश्‍वर विभागात येणार्‍या पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनचे काम अद्यापही भाळवणी गावाजवळ आले असून सहा महिन्यापासून काम रखडले आहे. ठेकेदारानी खोदलेली चारी न बुजवल्याने शेतकय्रांला आपली जमीन पडीत ठेवावी लागली.

त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात मिळणारे उत्पन्न थांबले असून ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या दुर्लक्षामुळे लगतच्या शेतकय्राचे नुकसान झाले याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाय्राला विचारले असता ठेकेदारांने खोदाई करुन ठेवली पाईप नसल्यामुळे विलंब झाला याबाबत ठेकेदारास सांगीतले असून तातडीने बुजवण्यात येईल व पाईप उपलब्ध झाल्यावर पुन्हा खोदाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

अनेक वर्षातील दुष्काळामुळे शेतीतील उत्पन्न मिळाले नाही यंदा पाऊस चांगला होवूनही पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार व अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे या अर्धा एकर शेतीमधील खरीप व रब्बी हंगामात उत्पन्नास मुकलो ...
- दीपक निकम, शेतकरी, भाळवणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com