'सकाळ'च्या स्वच्छता जागर मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

राजशेखर चौधरी
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

या स्वछता मोहिमेच्या या लोकसहभागाच्या चळवळीत झालेल्या श्रमदानातून कमलाराजे चौकातील गेल्या कित्येक वर्षांपासून अस्वच्छ असलेला आयलॅंड स्वच्छ करण्यात आला. प्रियदर्शनी कार्यालयाचा परिसर, निर्मलराजे कन्या प्रशालेचा भाग आणि ग्रामीण रुग्णालया प्रवेशद्वाराजवळील भाग काटेरी झुडुपे व गवतमुक्त करण्यात आला. 

अक्कलकोट : दैनिक सकाळच्या वतीने करण्यात आलेल्या स्वच्छता जागर अभियानास अक्कलकोटमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत प्रियदर्शिनी सांस्कृतिक भवन परिसर, कमलाराजे चौक, आयलँड आणि ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचा परिसर काल (गुरुवारी) सकाळी स्वच्छ करण्यात आला.

नगरपरिषद, विवेकानंद प्रतिष्ठान, रोटरी क्‍लब, बार असोसिएशन, रिपाइं (आ), प्रभाग आठचे नगरसेवक नसरोद्दीन मुतवल्ली व सारिका पुजारी, पोलिस प्रशासन विभाग आदींचे सहकार्य लाभले. सकाळी साडेआठ वाजता कमलाराजे चौकात या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, स्वामी समर्थ देवस्थान समिती अध्यक्ष महेश इंगळे, पोलिस निरीक्षक सूरज बंडगर, मधुकर पवार, सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, "सकाळ'चे वितरण व्यवस्थापक संजय भंडारी, नारायण आठवले, रोटरीचे अध्यक्ष विलास कोरे, सचिव दिनेश पटेल, अशोक येणगुरे, अॅड. विजय हर्डीकर, बाबा निंबाळकर, सुभाष गडसिंग, रिपाइं (आ) तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, सुभाष पुजारी, हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथील भाऊसाहेब डोंगरे, नंदकुमार पाटील, ग्रामविस्तार अधिकारी यलगुंडे आदी उपस्थित होते. 

"सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी व युनिट मॅनेजर किसन दाडगे यांनी "सकाळ'च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमामागील भूमिका विषद केली. या स्वछता मोहिमेत सहभागी १०० कर्मचाऱ्यांना नगरसेवक नसरोद्दीन मुतवल्ली यांच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.या वेळी रवी शहा, एजाज मुतवल्ली, मल्लिनाथ मसुती, सिद्धाराम मसुती, जितेंद्रकुमार जाजू, डॉ. विपुल शहा, चंद्रकांत दसले,सागर शिंदे तसेच विठ्ठल तेली, मलय्या स्वामी, नितीन पेठकर नागनाथ कुरणे आदी नगरपरिषद अधिकारी सुभाष कल्याणी, धनराज कांबळे आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. "सकाळ'चे तालुका बातमीदार राजशेखर चौधरी यांनी सूत्रसंचलन केले. 

सकाळ माध्यम समूहाने सुरू केलेली लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ निश्‍चितच प्रेरणादायी आहे. नगरपरिषद यासाठी सतत प्रयत्नशील आहे. येत्या तीन महिन्यांत अक्कलकोट शहर कचरामुक्त करण्यात येईल. 
- डॉ. प्रदीप ठेंगल, मुख्याधिकारी, नगरपालिका 

शहरे स्वच्छ करण्याचा "सकाळ'चा उपक्रम गौरवदायी आहे. येत्या काळात सर्व वंचित महिलांच्या स्वच्छ आरोग्यासाठी पोलिस प्रशासनाच्या सहकार्यातून विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात येणार आहे. 
- नानासाहेब कदम, सहायक पोलिस निरीक्षक 

परिसर स्वच्छता 
या स्वछता मोहिमेच्या या लोकसहभागाच्या चळवळीत झालेल्या श्रमदानातून कमलाराजे चौकातील गेल्या कित्येक वर्षांपासून अस्वच्छ असलेला आयलॅंड स्वच्छ करण्यात आला. प्रियदर्शनी कार्यालयाचा परिसर, निर्मलराजे कन्या प्रशालेचा भाग आणि ग्रामीण रुग्णालया प्रवेशद्वाराजवळील भाग काटेरी झुडुपे व गवतमुक्त करण्यात आला. 

तनिष्काचा सन्मान 
प्रिसिजन फाऊंडेशनचा तीन लाखांचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मिळाल्याबद्दल जेऊरच्या तनिष्का गटप्रमुख रूपा कणमुसे व त्यांचे पती इरण्णा कणमुसे यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: marathi news marathi websites Solapur News Akkalkot News