शिवसेना जिल्हा प्रमुखांचा पक्षांतर्गत विरोधकांना झटका 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

सोलापूर : 'नो शहर उत्तर...नो शहर मध्य...' आता डायरेक्‍ट 'विधान परिषदेचाच झेंडा...' सांगत होते महापालिकेतील विरोधी पक्षनेता तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे. 

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असलेल्या कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत गटबाजीने उचल खाल्ली आहे. विरोधात थेटपणे कोणी बोलत नसले तरी शह-काटशह देण्यामध्ये दोन्ही बाजूने प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची घेतलेली भेट व त्यांना लोकसभेसाठी धरलेला आग्रह, अशी चर्चा आहे. 

कोठे यांचे वडील तथा शिंदे यांचे सहकारी दिवंगत विष्णूपंत कोठे यांचे नाव अनेकवेळा विधानपरिषदेसाठी चर्चेत आले. मात्र ते प्रत्यक्षात कधी झाले नाही. विष्णूपंत यांच्या अखेरच्या दिवसांत तरी ही संधी मिळेल असा आशावाद होता, मात्र तोही मावळला. या आणि काही अंतर्गत घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महेश यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयास विष्णूपंतांनी विरोध केला होता, मात्र महेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. तेंव्हापासून सुशीलकुमार शिंदे व महेश कोठे यांच्यात 'राजकीय वितुष्ठ' आले. 

या पार्श्‍वभूमीवर कोठे यांना कोणत्या पद्धतीने त्रास होईल याबाबत त्यांच्या विरोधकांनी प्रयत्न सुरु केले. त्यातच कोठे यांच्यामुळे महापालिका निवडणुकीत तसेच संघटनात्मक पातळीवर नाराज झालेल्यांनी वेळ मिळेल तेंव्हा संधी साधली. त्यातच काही दिवसांपूर्वी कोठे यांनी सोलापूर शहर उत्तर मधून शिवसेनेचाच आमदार होणार असे वक्तव्य केल्याने, या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटली. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या पक्षांतर्गत घडामोडी सुरु झाल्या आहेत. 

कार्यकर्त्यांची पुरेशी साथ नसतानाही महापालिकेत एक-दोन नव्हे तब्बल 21 नगरसेवक निवडून आणले. त्याचीच बक्षिसी म्हणून 'परिषदे'वर जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे 'उत्तर' आणि 'मध्य'मधून निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक असणाऱ्यांना शुभेच्छा. 
- महेश कोठे, जिल्हा प्रमुख विरोधी पक्षनेता, महापालिका

Web Title: marathi news marathi websites Solapur News Shiv Sena Mahesh Kothe