खासदार झाल्यानंतर गावात फिरकले सुध्दा नाहीत!

हुकूम मुलाणी
रविवार, 28 जानेवारी 2018

मंगळवेढा - तालुक्यातील जनता केंद्र सरकारच्या विविध योजनेच्या लाभापासून वंचित राहत असून याबाबत न्याय कोणाकडे मागायचा? हा प्रश्‍न येथील जनतेला पडला असून खा. शरद बनसोडे यांचे मंगळवेढयात संपर्क कार्यालय नसल्यामुळे न्याय मागणे अडचणीचे ठरत आहेत. मोहोळ येथे जनता दरबार घेतला आता मंगळवेढयाची जनता देखील खासदाराच्या जनता दरबाराच्या प्रतिक्षेत आहे.

मंगळवेढा - तालुक्यातील जनता केंद्र सरकारच्या विविध योजनेच्या लाभापासून वंचित राहत असून याबाबत न्याय कोणाकडे मागायचा? हा प्रश्‍न येथील जनतेला पडला असून खा. शरद बनसोडे यांचे मंगळवेढयात संपर्क कार्यालय नसल्यामुळे न्याय मागणे अडचणीचे ठरत आहेत. मोहोळ येथे जनता दरबार घेतला आता मंगळवेढयाची जनता देखील खासदाराच्या जनता दरबाराच्या प्रतिक्षेत आहे.

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करुन खासदार झालेल्या शरद बनसोडे यांना प्रचारात तालुक्यातील प्रत्येक गावात जाता आले नसले तरी सर्वच गावातील मतदारांनी भरभरुन मतदान केले. आतापर्यंत त्यांचे दौरे हे ठराविक गावालाच झाले आणि खासदार निधी तसाच दिला. त्यामुळे अन्य गावातील लोकांना खासदार भेटनासे झाले. निवडून आल्यानंतर दक्षिण दुष्काळी भागात मतदारांचे आभार माननेसाठी खासदार बनसोडे यांनी तुम्ही माझ्या झोळीत मताचे भरभरून दान टाकले असून 35 गावातील शेतकऱ्यांना मी अगदी थोड्या कालावधीत पाणी आणून देणारच असे आश्वासन देऊन आज जवळपास चार वर्षे झाली. परंतू ना खासदार इकडे फिरकले ना पाणी आले. यामुळे खासदारचे हे आश्ववासन हवेतच विरले. बहुचर्चित 35 गावाच्या पाणी प्रश्‍न लोकसभेत मांडला गेल्यांने लोकांना योजनेबद्दल आशा वाटत असताना यामध्ये काहीच हालचाल झाली. ही योजना राजकीय श्रेयात अडकल्याची चर्चा तालुक्यात सुरु झाली. केंद्रात व राज्यात सत्ता असताना या योजनेतील अडथळे पार करुन ही योजनेस निधी मंजूर करणेसाठी प्रयत्न होणे आवश्यक होते. पण चार वर्षे होत आली, यात म्हणावी अशी प्रगती झाली नाही. पंढरपूर विजापूर मंजूर रेल्वेचे पुढे काय झाले यांची माहिती तालुक्याला नाही. याशिवाय मनरेगा निधी मोठया प्रमाणात असताना या योजनेतील कामे वेग घेवू शकली नाहीत. 2011 च्या सामाजिक आर्थिक जात निहाय सर्वेतील किती लाभार्थी निवडले हे अदयापही गुलदस्त्यात आहे. या यादीचे प्रसिध्दीकरण झाले नाही. शासकीय लाभासाठी जुन्याच यादीचा आधार घेतल्याने अनेक योजनेचा लाभ एकाच लाभार्थ्याचा मिळत असल्याचे चित्र आहे. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे उदिष्ठ देखील वाढवणे आवश्यक आहे. पंतप्रधान उजाला योजनेतील अनेक महिला लाभार्थी वंचित असून त्यांना अदयापही गॅस मिळाला नाही. दोन्ही सत्ता असूनही संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद शशीकांत चव्हाण यांना देण्यासाठी तीन वर्षे लावली. अध्यक्षपद मिळताच चव्हाण यांनी माहितीपत्रक वाटून या योजनेच्या लाभाविषयी प्रबोधन केले. यापुर्वी या निवडी झाल्या असत्या तर पक्षवाढीला याचा फायदा झाला असता पण पक्षनेत्यांनी तालुक्यातील कार्यकर्त्याचा विचार देखील केला नाही. मोहोळ प्रमाणे जनता दरबार घेतल्यास तालुक्यातील जनतेला थेट खासदारांना भेटता येईल व आपले प्रश्‍न मांडता येतील म्हणून जनता खासदारांच्या जनता दरबाराच्या प्रतिक्षेत आहे. 

 

Web Title: marathi news Member of Parliament no development