मिरज न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमांची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

मिरज : येथील न्यू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, असा सोहळा येत्या शनिवारी (ता. 30) शाळेच्या प्रांगणात रंगणार आहे. या दिवशी इथे विचारांची, लढवैय्यांच्या अनुभवांची आणि गद्य अन्‌ पद्य रूपाने अवतरलेल्या अनुभवांची पेरणी होणार आहे. आपल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्त्वाची पताका फडकावणारे डॉ. अनिल अवचट, अॅड. उज्ज्वल निकम, अच्युत गोडबोले, कवी संदीप खरे हे नामवंत संवाद साधणार आहेत. शहराच्या शिक्षण क्षेत्राचा मानदंड म्हणून न्यू इंग्लिश स्कूलचा परिचय आहे. या संस्थेने पन्नास वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने हा सोहळा रंगणार आहे.

मिरज : येथील न्यू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, असा सोहळा येत्या शनिवारी (ता. 30) शाळेच्या प्रांगणात रंगणार आहे. या दिवशी इथे विचारांची, लढवैय्यांच्या अनुभवांची आणि गद्य अन्‌ पद्य रूपाने अवतरलेल्या अनुभवांची पेरणी होणार आहे. आपल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्त्वाची पताका फडकावणारे डॉ. अनिल अवचट, अॅड. उज्ज्वल निकम, अच्युत गोडबोले, कवी संदीप खरे हे नामवंत संवाद साधणार आहेत. शहराच्या शिक्षण क्षेत्राचा मानदंड म्हणून न्यू इंग्लिश स्कूलचा परिचय आहे. या संस्थेने पन्नास वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने हा सोहळा रंगणार आहे. माजी विद्यार्थी मेळावा आणि संवाद सत्र असे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. विनोद परमशेट्टी यांनी दिली. ते म्हणाले, देश-विदेशात विखुरलेले दोन हजारांहून अधिक विद्यार्थी या आनंद सोहळ्यात सहभागी होणार आहेत. 

सकाळी 9 वाजता ख्यातनाम लेखक डॉ. अनिल अवचट 'चुकलेल्या शाळेची वाट' यावर बोलतील. सकाळी 10 वाजता महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा होईल. त्यानंतर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दयानंद नाईक घेतील. दुपारच्या सत्रात संगणक विश्‍वासह अनेक विषयांवर सहजहस्ते लेखन करणारे अच्युत गोडबोले हे "मी व माझे लेखन' या विषयावर संवाद साधतील. प्रख्यात कवी संदीप खरे यांच्या काव्यवाचनाने सांगता होईल. मिरजकरांसाठी ही पर्वणी असेल. खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, विशाल पाटील, संजय भोकरे यांच्यासह संस्थेच्या अध्यक्षा स्मिता चव्हाण उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: Marathi news miraj new engilsh school golden jubilee year