मिरज दंगलीचे जुने व्हिडिओ व्हायरल : व्हॉटस्अॅप ग्रुप अॅडमिन अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

मिरजेत 2009 मध्ये झालेल्या दंगलीचे व्हिडिओ व्हॉट्‌स अॅप ग्रुपवर व्हायरल करुन धार्मिक तेढ, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न यंदाच्या गणेशोत्सवात झाला. त्याची दखल घेत पोलिसांनी चार दिवसात दंगलीच्या व्हिडिओ क्‍लीप व्हायरल करणारे आणि व्हॉट्‌स अॅप ग्रुपचे अॅडमीन यांच्यावर कारवाई करण्याची मोहिमच उघडली आहे.

सांगली : गणेशोत्सव काळात झालेल्या मिरज दंगलीचे आठ वर्षांपूर्वीचे व्हिडिओ व्हॉट्‌स अॅप ग्रुपवर व्हायरल करुन तणाव निर्माण केल्या प्रकरणी मिरजेतील एका ग्रुप अॅडमीनला अटक करण्यात आली. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तासगाव येथील एकाला या क्‍लीप शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आली. आजवर अटक केलेल्यांची संख्या दहा झाली.

मिरजेत 2009 मध्ये झालेल्या दंगलीचे व्हिडिओ व्हॉट्‌स अॅप ग्रुपवर व्हायरल करुन धार्मिक तेढ, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न यंदाच्या गणेशोत्सवात झाला. त्याची दखल घेत पोलिसांनी चार दिवसात दंगलीच्या व्हिडिओ क्‍लीप व्हायरल करणारे आणि व्हॉट्‌स अॅप ग्रुपचे अॅडमीन यांच्यावर कारवाई करण्याची मोहिमच उघडली आहे. 

कोल्हापूरमधील चार ग्रुप अॅडमीन आणि व्हिडिओ पसरवणारे चौघे अशा आठजणांना अटक करुन कारवाई करण्यात आली. मिरजेतील संदिप दिंडे ग्रुपवरुन असे व्हिडिओ व्हायरल झाल्याने या ग्रुपचा अॅडमीन संदिप दिंडेला अनंत चतुर्दशीची मिरवणूक सुरु असतानाच अटक करण्यात आली. आज तासगाव येथील एकाला व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी

Web Title: Marathi news Miraj riot Whatsapp admin arrested