भीमा प्रकल्पाची यशस्वी सुरवात  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

सहविजनिर्मिती व विस्तारीकरणचे प्रकल्प सुरू नसताना काढलेल्या 200 कोटी कर्जातील 74 कोटी रुपयांची परतफेड केली. याची कुठे चर्चा झाली नाही. वेळ आल्यावर अपप्रचार करणाऱ्यांचा खरपुस समाचार घेऊ असे सांगत गुढीपाडव्या निमित्त प्रति सभासदांना 30 किलो साखर देणे आणि कार्यक्षेत्रात समाविष्ठ झालेल्या गावातील शेतकऱ्यांना सभासदत्व देण्यात येणार असल्याची घोषणा भीमाचे अध्यक्ष तथा खा. धनंजय महाडिक यांनी केले. 

मोहोळ - भीमाच्या इतिहासात आज सोन्याचा दिवस आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करावी, भविष्यात शेती हाच एकमेव शाश्वत उद्योग आहे. भिमावरील कर्जाचा अपप्रचार करण्यात आला मात्र सहविजनिर्मिती व विस्तारीकरणचे प्रकल्प सुरू नसताना काढलेल्या 200 कोटी कर्जातील 74 कोटी रुपयांची परतफेड केली. याची कुठे चर्चा झाली नाही. वेळ आल्यावर अपप्रचार करणाऱ्यांचा खरपुस समाचार घेऊ असे सांगत गुढीपाडव्या निमित्त प्रति सभासदांना 30 किलो साखर देणे आणि कार्यक्षेत्रात समाविष्ठ झालेल्या गावातील शेतकऱ्यांना सभासदत्व देण्यात येणार असल्याची घोषणा भीमाचे अध्यक्ष तथा खा. धनंजय महाडिक यांनी केले. 

टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या नूतन 25 मेगावॅट सहविजनिर्मिती व विस्तारीकरण प्रकल्पाच्या शुभारंभ खा. महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महाडिक पुढे म्हणाले, भीमाच्या निवडणुकीत सभासदांना दिलेली अभिवचने पूर्ण केली. त्यातील महत्त्वाचा व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा टप्पा आज पूर्ण झाल्याचे मला समाधान झाले. या प्रकल्पापैकी 112 कोटीचा सहविजनिर्मितीचा तर 86 कोटीचा विस्तारीकरणाचा प्रकल्प आहे. महिन्याला 6 कोटी रुपयांची वीज तयार होणार आहे. त्यामुळे भीमाच्या कर्जाची चिंता कोणीही करू नये. प्रकल्प सुरू होण्याअगोदर 51 कोटी व स्व-गुंतवणुकीतून 23 कोटी असे मिळून 74 कोटी रुपयांची परत फेड सुद्धा केली आहे. येत्या दिवाळीत असावणी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.  

या प्रकल्पामुळे भविष्यात भीमा 12 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निकाली निघाला आहे. साखरेच्या दराबाबत सर्वसाधारण घरगुती खाणाराला कमीदर व उपपदार्थ निर्मितीसाठी वेगळा दर करण्याचा शासनाचा विचार आहे. आम्ही बफर स्टॉकची मागणी केली आहे. 

यावेळी व्यासपीठावर पृथ्वीराज महाडिक, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, बबन महाडिक, मंगलताई महाडिक, पवन महाडिक, श्रीधर बिरजे, तानाजी खताळ, अशोक सरवदे, माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील, राजेश पवार, सभापती समता गावडे, उपसभापती साधना देशमुख, सर्जेराव चवरे, सौदागर खडके, पांडुरंग बचुटे, सुनील चव्हाण, सुरेश शिवपूजे, भारत पाटील, राजू बाबर, झाकीर मुलाणी, माणिक बाबर, आदींसह सर्व संचालक वृंद, सर्व विभागाचे खाते प्रमुख, शेतकरी सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभाकर देशमुख, व संग्राम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी केले. सूत्र संचालन पांडुरंग ताटे यांनी करून आभार तुषार चव्हाण यांनी मानले.

भीमाच्या नवीन प्रकल्पाची वैशिष्टे -

* नवीन बसवीलेला सतरा मेगॅवॅट चा टर्बाईन व उचदाब बॉयलर मधे आधुनिक तंत्रशानाचा वापर 

* सहाविज निर्मीती साठी बगैस कमी लागणार 

* बॉयलरसाठी बसविण्यात आलेल्या ईएसपी या यंत्रणेमुळे बॉयलर मधील राख काढण्याची सुविधा 

* नवीन विस्तारीकरण प्रकल्पामुळे दररोज साडेपाच हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप 

* नवीन बसविलेल्या रोलर मिलमधे ट्रासप्लेट नसल्याने देखभाल खर्च कमी येणार 

* अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे साखरेचा दर्जा सुधारणार आहे व शुगरलॉस कमी होणार आहे

* कारखान्याच्या वेस्टेज पाण्याचा वापर बेणे प्लॉट व अन्य कारणासाठी वापर 

* महिन्याला एक कोटी ऐंशी लाख युनिट विज तयार होणार 

* विज विक्रीसाठी महावितरण बरोबर पाच रुपये प्रती युनिट दराचा करार

Web Title: marathi news mohol bhima project start dhananjay mahadik