डोंगरदऱ्यांत मिळतेय दर्जेदार शिक्षण!

सूर्यकांत नेटके
शुक्रवार, 9 मार्च 2018

नगर - बालाघाट, गर्भगिरी डोंगरांचा आणि दऱ्याखोऱ्यांचा परिसर. डोंगराच्या कुशीतच अल्पसंख्याक समाजाची ४५ घरांची डोईफोडे वस्ती. जिल्हा परिषदेची शाळा असली तरी कुटुंबाच्या भटकंतीमुळे बालके शिक्षणापासून दूरच. तथापि, गावकरी, पालक, सर्वदूरचे दानशूर आणि शिक्षक पोपट फुंदे यांच्या पुढाकारातून परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. पाथर्डी तालुक्‍यातील मोहरी गावाजवळच्या डोईफोडे वस्तीवरील चित्र आदर्श सांगणारे आहे. येथे आता गरिबांच्या मुलांना इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण मिळत आहे. शाळा विकासासाठी लोकसहभागातून सुमारे बारा लाखांची कामे येथे झाली आहेत. 

पाथर्डी तालुक्‍यातील मोहरी गावापासून तीन किलोमीटरवर पश्‍चिमेला डोईफोडे वस्ती. वस्तीवर १९८३ पासून जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा आहे. मात्र येथे राहणारी कुटुंबे मेंढपाळ, ऊसतोड कामगार, हमाल आणि रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे मुलेही आई-वडिलांसोबत भटकंती करायची. त्यामुळे शाळेच्या पटावर मुले असली तरी भटकंतीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. दीड वर्षापूर्वी येथे शिक्षक पोपट फुंदे रुजू झाले अन्‌ शाळेचा कायापालट सुरू झाला. फुंदेंना हजर झाल्यादिवशी शाळेच्या पटावर सोळा विद्यार्थ्यांची नोंद दिसली. मात्र बारा पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचे नाकारले. फुंदे यांनी पालकांना विनंती करून मुलांना शाळेत पाठवायला भाग पाडले. शाळेत आज २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  डोईफोडे वस्तीवर दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळत आहे. पहिली-दुसरीचे विद्यार्थी इंग्रजी वाचतात. फुंदे यांनी ‘‘अध्यापनमुक्त शाळा, दप्तरमुक्त शाळा, संपूर्ण ई-लर्निंग, टॅबलेट शाळा आणि कृतीयुक्त सहज शिक्षण’’ या उपक्रमांद्वारे दर्जेदार शिक्षणाचा ध्यास घेतला. शिक्षकाच्या पुढाकाराला गावकऱ्यांनी साथ दिली. 

विद्यार्थ्यांचा सांभाळ 
डोईफोडे वस्तीवरील बहुतांश कुटुंबे रोजगारासाठी स्थलांतरित होतात. मात्र त्यांच्या मुलांचे स्थलांतर रोखून पोपट फुंदे यांनी हातभार लावला. त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती स्थलांतरित झाल्या तरी त्यांच्या तब्बल आठरा मुलांचा येथे राहणारे नातेवाईक आणि अन्य कुटुंबे संभाळ करत आहेत. 

दोन हजार लोकांच्या भेटी 
शिक्षकांचा पुढाकार आणि लोकसहभाग यातून शाळेचा विकास कसा होऊ शकतो, हे पाहण्यासाठी वस्तीला दूरवरचे शिक्षक, शालेय समितीचे पदाधिकारी सतत भेट देतात. आतापर्यंत दोन हजार लोकांनी भेट दिली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार, खासदार यांच्यासह लोकप्रतिनिधींनीही भेटी देऊन कौतुक केले आहे. 

गरिबांच्या वस्तीवरील परिस्थिती बदलण्यासाठी मी पुढे आलो. लोकांनी साथ दिली. आता येथील मुले सहजपणे इंग्रजी वाचतात. तीच अल्पसंख्याक, गरीब कुटुंबांचे भवितव्य बदलू शकतात. 
- पोपट फुंदे

Web Title: marathi news nagar education