बॉम्बस्फोट झालेले 'ते' पार्सल संजय नहारांसाठी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

नगर : शहरातील माळीवाडा भागात असलेल्या कौठीच्या तालमीजवळील मारुती कुरिअरच्या कार्यालयात रात्री उशिरा झालेल्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले. अज्ञात व्यक्तीने काल (ता. 20) दुपारी एकच्या सुमारास पुण्यातील संजय नहार यांच्या नावाने हे पार्सल दिले होते.

नगर : शहरातील माळीवाडा भागात असलेल्या कौठीच्या तालमीजवळील मारुती कुरिअरच्या कार्यालयात रात्री उशिरा झालेल्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले. अज्ञात व्यक्तीने काल (ता. 20) दुपारी एकच्या सुमारास पुण्यातील संजय नहार यांच्या नावाने हे पार्सल दिले होते.

Image may contain: 5 people, outdoor

तथापि, त्याचे वजन जास्त वाटल्याने कुरिअरमधील संदीप भुजबळ यांनी ते उघडले. त्यातील रेडिओसारखी दिसणारी वस्तू त्यांनी विजेला जोडताच तिचा स्फोट झाला. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, त्याच्या तपासासाठी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चोबे नगरमध्ये पोचले आहेत.

याविषयी बोलताना संजय नहार म्हणाले, की  काश्मीरचे नागरिकांना जोडण्याचे काम मी करतोय, मी कोणाच्या विरोधात काम करीत नाही. माझ्या कामाला विरोध असणाऱ्यांचा हा प्रयत्न असावा. मला नगर येथील घटनेविषयी काही कल्पना नाही. नगर पोलिसांनी मला माहिती कळविली असुन,ते चौकशी करण्यासाठी येणार आहेत.

अत्यंत कमी वर्दळीचे ठिकाण शोधून अज्ञातांनी हा कट राबविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्सलसोबत एका मुलीच्या नावाने दिलेले पत्र आहे. त्यात नहार यांनी त्या मुलीस केलेल्या विशेष मदतीविषयी आभार व्यक्त करणारा मजकूर आहे. पार्सल देऊन गेलेल्या व्यक्तीने त्यावर लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यास तो अस्तित्वात नसल्याचे सांगितले जात आहे. 

Image may contain: 9 people, people standing, crowd and outdoor

कोण आहेत संजय नहार?
संजय नहार हे सरहद या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. पुण्यात त्यांची शैक्षणिक संस्था असून, सरहद या संस्थेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. काश्मीरमधील नागरिकांशी संवाद, काश्मीरमधील पर्यटनाला चालना यादृष्टीने ते सतत काम करत असतात. नुकतीच त्यांनी कारगिलमध्ये मॅरथॉनचे आयोजन केले होते. त्यांची काश्मीरमधील विषयांवर पुस्तकेही आहेत.  

Web Title: marathi news nagar mobile blast in courier office nagar maliwada

टॅग्स