सावळीविहीर येथे केंद्रस्तरीय गुणदर्शन स्पर्धा संपन्न

अमोल वाघमारे
शनिवार, 30 डिसेंबर 2017

सावळीविहीर(नगर) : बालवयात जे संस्कार होतात तेच जन्मभर टिकून राहतात. शालेय जिवनात संस्कार रुजविण्याचे काम शिक्षक करतात. शाळा म्हणजे विद्यार्थी घडविण्याचे केंद्र असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे यांनी केले. राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न झाल्या. प्रमुख पाहुणे म्हणुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच सोपान पवार हे होते.

सावळीविहीर(नगर) : बालवयात जे संस्कार होतात तेच जन्मभर टिकून राहतात. शालेय जिवनात संस्कार रुजविण्याचे काम शिक्षक करतात. शाळा म्हणजे विद्यार्थी घडविण्याचे केंद्र असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे यांनी केले. राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न झाल्या. प्रमुख पाहुणे म्हणुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच सोपान पवार हे होते. या केंद्रस्तरीय स्पर्धेमधे सावळीविहीर बुद्रुक, सावळीविहीर फार्म, जी. आर. बी. वाडी, हनुमान क्लास, कोहकी येथील शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये हस्ताक्षर लेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा झाल्यांनतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी, केंद्र प्रमुख विश्वनाथ कांबळे, मुख्याध्यापिका मंगला दहिफळे, राजेश सरोदे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पारडे, गणेश आगलावे, उमेश आरणे, दत्तु पवार, दिनेश आरणे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.

 

Web Title: Marathi news nagar news extra acticities competition