'बिरोबा' महाराज यात्रोत्सव उत्साहात, भाविकांची मांदीयाळी

हरिभाऊ दिघे 
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज देवाच्या दोन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची भाविकांच्या मांदियाळीत उत्साहात सांगता झाली. यानिमित्ताने कुस्त्यांचा फड रंगला. गुरुवारी सकाळी विधीवत पूजाअर्चा करीत देवाचा अभिषेक करण्यात आला. दुपारी पाचशेहून अधिक बोकड बळी देत भाविकांनी देवाचे नवस फेडले. 

सायंकाळी बँड पथकांनी हजेरी लावली. रात्री साडेआठ वाजता गावातून बिरोबा देवाच्या पालखी व काठीची मिरवणूक काढण्यात आली. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देवाच्या काठीचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच अनिल कांदळकर, सचिन दिघे यावेळी उपस्थित होते. रात्री शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर प्रेक्षकांनी मोफत लोकनाट्य तमाशाचा मनमुराद आनंद लुटला. 

रात्री डफांच्या निनादात बिरोबा मंदिरात पारंपारिक होईक झाले. मंदिरासह तळेगाव चौफुली परिसरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली. दोन दिवस चाललेल्या यात्रोत्सवात दीड लाखाहून अधिक भाविकांनी सहभागी होत देवदर्शनाचा लाभ घेतला. यावर्षी तीस लाखाहून अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. यंदाही यात्रोत्सव समितीने चांगले नियोजन केले होते. शुक्रवारी दुपारी कुस्त्यांचा जंगी फड रंगला. अनेक चीतपट झालेल्या कुस्त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. दोन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली.

Web Title: Marathi news nagar news festival yatra