तरुणीस जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

हरिभाऊ दिघे 
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील निमोण येथे राहत्या घरात घुसून मागील भांडणाच्या कारणावरून एका विवाहित तरुणीस शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली.

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील निमोण येथे राहत्या घरात घुसून मागील भांडणाच्या कारणावरून एका विवाहित तरुणीस शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली.

मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील निमोण येथील रहिवाशी यास्मिन अरिफ शेख (वय २२) यांना मंगळवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरात घुसून आरोपी हिराबाई बाळासाहेब घुगे व दशरथ घुगे (रा. निमोण) यांनी शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. झालेल्या झटापटीत यास्मिन शेख यांची गळ्यातील पोत तुटून गहाळ झाली. तशा आशयाची फिर्याद यास्मिन शेख यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार हिराबाई बाळासाहेब घुगे व दशरथ घुगे या दोघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गु. रजि. क्र. २६ / २०१८ भा. द. वि. कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार इक्बाल शेख अधिक तपास करीत आहे.

Web Title: Marathi news nagar news girt beating crime