नगर जिल्ह्यातील कोरठण खंडोबाची यात्रा उत्साहात पडली पार

Korthan
Korthan

नगर : राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानाला यात्रा अनादी काळापासून आहे. पण २० वर्षांपूर्वी मंदिराला नवीन शिखर व सोन्याचा कळस बसविला तेव्हापासून यात्रेला गर्दी वाढत असून यावर्षी २० वर्षातील उच्चांकी गर्दीत व उत्कृष्ट नियोजनात ही यात्रा पार पडली. मानपानावरून मानकार्याचे होणारे वाद, वाढत जाणाऱ्या यात्रेला अपुरी पडणारी जागा, पाण्याची टंचाई या सर्वावर मात करत यावर्षी सुमारे ८ लाखाच्या वर भाविक तीन दिवसात आले. असावेत असा अंदाज आहे. वीस वर्षांत यात्रेत खूप बदल झाला आहे. गर्दी प्रचंड वाढली पण यात्रेचे वैशिष्ट्ये व परंपरा कायम राहिल्या आहेत. पूर्वी प्रवासाला साधने कमी होती तेव्हा बैलगाडीने येणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. शंभरच्या वर बैलगाड्या लोक घेऊन येत व तीन दिवस राहत होती. 

पूर्वी बैलगाडे देवदर्शनाचा कार्यक्रम होत असत. अनेक भाविक आपले बैल देवाच्या दर्शनाला घेऊन येतात. यावर्षी भरणारा बाजार स्थलांतरीत करण्यात आला. तर रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या मंडळींना पर्यायी जागा देण्यात आली व रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने पाच मीटर आत घेण्यात आली. त्यामुळे रस्ता प्रशस्त झाला व भाविक व्यवस्थित येऊ शकले. मंदिरापासून सुमारे दीड किमी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे वाहतुक कोंडी झाली नाही. दरवर्षी यात्रेची गर्दी वाढत असून दर उत्सवाला एस.टी. महामंडळ गाड्यांची सोय करते

पौष शुध्द पौर्णिमेला देवाचे म्हाळसा सोबत लग्न झाले म्हणून मोठी यात्रा आणि उत्सव 3 दिवस भरवला जातो. गगनाला भिडणाऱ्या 80 फुट काठ्यांमुळे सांस्कृतिक कलेचे दर्शन यानिमित्ताने घडते. यात्रेच्या 8 दिवस आधी पारंपरिक गाणे म्हणून देवाला हळद लावण्याचाकार्यक्रम महिला करतात. भाविकांच्या उपस्थितीत  बेल्हे (जि. पुणे) व ब्राम्हणवाडा येथील मानाच्या काठ्यांची मिरवणुक होऊन शासकीय महापुजा व महाआरती झाल्यानंतर या काठ्यांनी कळस व देवदर्शन घेतल्यानंतर इतर गावच्या काठ्यांची मिरवणुक होऊन तीन दिवस चाललेल्या वार्षिक यात्रोत्सवाची सांगता झाली. दरवर्षी काठी तुटण्याचा प्रकार होत असे, यावर्षी अत्यंत देखणा सोहळा झाला यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मानाच्या काठ्यांची शाही मिरवणुक गगनगिरी महाराजांच्या मंदिरासमोर आल्यानंतर काठ्यांची महाआरती व मानकऱ्यांचा सत्कार केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com