संगमनेर येथील भव्य अश्‍व प्रदर्शन ठरले आकर्षणाचा बिंदू

हरिभाऊ दिघे 
बुधवार, 31 जानेवारी 2018

घोडा हा माणसाचा आवडता प्राणी असून घोडेस्वारी हा आवडता छंद असतो. देवगड येथे होत असलेल्या विविध जातींच्या घोडे प्रदर्शन व स्पर्धेमुळे या यात्रेचा लौकिक राज्यभर पसरला. संगमनेर हे अश्‍व प्रदर्शनाचे राज्याचे प्रमुख आकर्षण ठरले.

तळेगाव दिघे (नगर) : घोडा हा माणसाचा आवडता प्राणी असून घोडेस्वारी हा आवडता छंद असतो. देवगड येथे होत असलेल्या विविध जातींच्या घोडे प्रदर्शन व स्पर्धेमुळे या यात्रेचा लौकिक राज्यभर पसरला. संगमनेर हे अश्‍व प्रदर्शनाचे राज्याचे प्रमुख आकर्षण ठरले, असे गौरवौद्गार लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेते धीरज विलासराव देशमुख यांनी काढले.

Horse Exhibition

संगमनेर तालुक्यातील देवगड येथे (हिवरगावपावसा) संगमनेर अश्‍वप्रेमी असोशिएशनतर्फे आयोजित भव्य अश्‍वप्रदर्शन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आयोजक रणजितसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, डॉ. राजीव शिंदे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, सभापती निशाताई कोकणे, भाऊसाहेब कुटे, शांताबाई खैरे, मिलींद कानवडे, शरयुताई देशमुख, अर्चनाताई बालोडे, सरपंच सुनिता गडाख, दशरथ पावसे, साहेबराव गडाख, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तुंबारे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते. 

अश्‍व प्रदर्शनात विविध अश्‍वांनी सादर केलेले नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमदार धीरज देशमुख म्हणाले, संगमनेर तालुका हा आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली विकासातून इतरांना दिशादर्शक ठरला आहे. दुष्काळी परिस्थितीतही या तालुक्याने सहकारातून समृद्धी निर्माण केली आहे. स्व. विलासराव देशमुख यांनी लातूर प्रमाणेच संगमनेर तालुक्यावर प्रेम केले. येथील सहकार व दुग्ध व्यवसायाचे मार्गदर्शन घेऊन आपण लातूरमध्ये काम करणार आहोत. रणजितसिंह देशमुख यांनी सुरु केलेले हे अश्‍व प्रदर्शन राज्यात सर्वात मोठे ठरले असून आगामी काळात या प्रदर्शनाचा राष्ट्रीय पातळीवर लौकिक होईल. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी अश्‍वांवर प्रवास करुन स्वराज्य निर्माण केले. मात्र आधुनिकतेमुळे अश्‍व मागे पडले असून त्यांची वाढ होणे गरजेची आहे. वेगवेगळ्या अश्‍वांच्या जाती व त्यांचे नृत्य हे सर्वांसाठी आनंददायी क्षण असून प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठेवा आहे. यापुढील काळातही संगमनेर व लातूरचे संबध अधिक दृढ होतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. धवलसिंह मोहिते म्हणाले, घोड्यांचा छंद हा मोठया प्रमाणात जोपासला जातो. त्यांची काळजी घेणे सोपे नाही परंतू महाराष्ट्र, हरियाणा व इतर राज्यांतून अश्‍वप्रेमी व अश्‍व मोठया प्रमाणात येथे दाखल झाले आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

रणजितसिंह देशमुख यांनी चांगली संकल्पना पुढे आणली आहे. या प्रदर्शनामुळे या भागाचे नाव राज्यभर  पोहचले आहे. रणजितसिंह देशमुख म्हणाले, देवगड देवस्थानचे महत्व वेगळे आहे. खंडोबाचे वाहन घोडा असल्यामुळे या अश्‍व प्रदर्शनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मोठया संख्येने महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यातील व्यापार्‍यांनी या अश्‍व प्रदर्शनास हजेरी लावली आहे. संगमनेर तालुक्याचे नाव माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यामुळे महाराष्ट्रात पोहचले. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे व तालुक्यातील सहकारी संस्थांमुळे संगमनेर तालुक्याचा लौकिक मोठा आहे. 

अश्‍वप्रेमी संघटनेने मागील सहा महिन्यांपूर्वी पेमगिरी ते शिवनेरी ही घोडेस्वारी मोहीम राबविली. या प्रदर्शनासाठी मागील तीन महिने मेहनत घेऊन ही स्पर्धा आयोजित केली. पुढील वर्षी आणखी मोठी स्पर्धा भरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या स्पर्धेत दाखल झालेले विविध रंगाचे व जातीचे घोडे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहेत.
 सत्यजीत तांबे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी आमदार बाळासाहेब थोरात व संगमनेर तालुक्यावर खूप प्रेम केले. पुढील पिढीने हे ऋणानुबंध कायम जपले आले. राज्याचे व देशाचे राजकारण हे वेगळया प्रध्दतीने सुरु असून आहे. स्व. विलासराव देशमुख यांची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पोकळी जाणवत आहे. अश्‍व प्रदर्शनाने देवगड यात्रा महाराष्ट्रात पोहचली असल्याचे ते म्हणाले.
 सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. अजय फटांगरे यांनी आभार मानले. अश्‍व प्रदर्शनाच्या आयोजनासाठी संगमनेर अश्‍वप्रेमी असोसिएशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.  

 

Web Title: Marathi news nagar news horse exhibition attraction