नगर जिल्ह्यातील सुप्यामध्ये बंधाऱ्यांकडे दुर्लक्ष 

Supe
Supe

सुपे (नगर) : वाघुंडे खुर्द (ता. पारनेर) येथील शिवारात सुमारे 10 वर्षापूर्वी झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला लोखंडी दरवाजे न बसविल्याने या बंधाऱ्यातील लाखो लीटर पाणी वाहून गेले आहे. तालुक्यात जलयुक्तशिवर योजना अनेक गावात राबवली जात आहे. मात्र या 16 दरवाजे असलेल्या बंधाऱ्याचे दरवाजे बसविण्याची तसदी कोणत्याच खात्याने न घेतल्याने गावातून नाराजी व्यक्त होत आहे. पारनेर तालुक्यात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या शिकवणूकीप्रमाणे पाणी आडवा पाणी जिरवा, तसेच जलयुक्तशिवार, सलग समतल चर, याशिवाय अनेक प्रकारची जलसंधारणाची कामे राबविली जात आहेत. मात्र यापूर्वी झालेल्या अनेक बंधारऱ्यांना गळती लागली आहे. तर काही गाळाने भरले आहेत. त्याकडे लक्ष दिले जात नाही त्यामुळे पावसाचे पाणी साठत वाहून जाते. याकडे फरसे लक्ष दिले जात नाही.     

वाघंडे येथील सुमारे दोनशे ते आडीचशे फूट लांबीच्या व 16 दरवाजे असलेल्या या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अतीशय मोठ्या प्रमाणात पाणी साठा होत असतो. मात्र दरवाजे न बसविल्याने येथे थेंबभर सुद्धा पाणी साठले नाही. या बंधाऱ्याचे दरवाजे लोखंडी आहेत तसेच हा बंधारा कोणत्या विभागाच्या आखत्यारीत येता याची माहितीच गावकऱ्यांना नाही. सरपंचानी या बंधाऱ्यास दरवाजे बसवावेत म्हणजे पाणी साठा होईल अशी मागणीही केली होती. मात्र याकडे कोणत्याच विभागाने लक्ष दिले नाही. परिणामी या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही या बंधाऱ्यात थेंबभर सुद्धा पाणीसाठा होऊ शकला नाही. पावसाचे पाणी पुराबरोबर वाहून गेले आहे. त्यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

तालुक्यात जलयुक्त शिवारयोजना राबवली जात आहे. तीचा प्राचारही मोठ्या धुमधडाक्यात केला जातो. वाघुंडे गावही जलयुक्त शिवार योजनेत आहे. गावात पाणी अडविण्यासाठी नविन बंधारे झाले मात्र या बंधाऱ्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. हा बंधारा सुस्थितीत असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व येथे दरवाजे न बसविल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. या बंधाऱ्यासाठी सरकारचा झालेला खर्च यामुळे व्यर्थ जात आहे, असे वाघुंडे खुर्दचे सरपंच संदीप मगर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com