भक्तिभाव, जल्लोषात कानिफनाथांची यात्रा सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

पाथर्डी (नगर) : "कानिफनाथ महाराज की जय' अशा जयघोषात, भक्तिभावाच्या वातावरणात मढी येथे आज कानिफनाथांच्या यात्रेला जल्लोषात सुरवात झाली. कैकाडी समाजाची मानाची काठी वाजतगाजत कानिफनाथ गडावर पोचली. मानकरी नारायणबाबा जाधव यांच्या हस्ते पूजापाठ करून नाथमंदिराच्या मुख्य कळसाला मानाची काठी भेटविण्यात आली. 

पाथर्डी (नगर) : "कानिफनाथ महाराज की जय' अशा जयघोषात, भक्तिभावाच्या वातावरणात मढी येथे आज कानिफनाथांच्या यात्रेला जल्लोषात सुरवात झाली. कैकाडी समाजाची मानाची काठी वाजतगाजत कानिफनाथ गडावर पोचली. मानकरी नारायणबाबा जाधव यांच्या हस्ते पूजापाठ करून नाथमंदिराच्या मुख्य कळसाला मानाची काठी भेटविण्यात आली. 

ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक रोहिदास जाधव, राम जाधव, हिरामण जाधव, बन्सी जाधव, अंबादास जाधव, मल्हारी गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, कैकाडी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, दीपक गायकवाड, किशोर जाधव, ज्ञानेश्वर माऊली, अवी गायकवाड, सागर जाधव, विष्णू गायकवाड, विशाल माने, अनिल जाधव, पोपट गायकवाड, सोपान गायकवाड, राजू गायकवाड, गणेश गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल वसंत फुलमाळी, स्वरूपचंद गायकवाड, राजू जाधव, गौरव गायकवाड, अमोल जाधव, संदीप माने यांनी कैकाडी समाजाच्या मठापासून काठीची मिरवणूक काढली. नाथांचा प्रसाद असलेला गूळ-भाकरीचा मलिदा वाटत गावाला प्रदक्षिणा घालून मानाची काठी गडावर आणली. 
पहिल्या काठीचा मान कैकाडी समाजाला देण्यात आला आहे. होळीच्या दिवशी सकाळी आरतीनंतर पूजा करून कैकाडी समाजाची मानाची काठी कानिफनाथांच्या समाधीला आणि मंदिराच्या कळसाला भेटविण्यात येऊन यात्रेला प्रारंभ होतो. देवस्थानाचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, उपाध्यक्ष सुनील सानप, आप्पासाहेब मरकड, शिवाजी मरकड, देविदास मरकड, सुधीर मरकड, अशोक पवार, मधुकर साळवे उपस्थित होते. मढीत यात्रा सुरू झाल्याने भटक्‍या समाजाच्या लोकांची गर्दी झाली आहे. 

मानकऱ्यांनी पेटविली मानाची होळी 
गोपाळ समाजाचे मानकरी हरिभाऊ किसन हंबीरराव (बेलगाव), नामदेव माळी (चिखली), पुंडलिक नवघरे (कोळपेवाडी), माणिक लोणारे (येवला), हरिदास रघुनाथ काळापहाड, गोवऱ्या वाहून नेणारे मानकरी सुंदर गिऱ्हे (माळवाडी) यांच्या हस्ते साखर बारवेजवळ आज सायंकाळी मानाची होळी पेटविण्यात आली. कानिफनाथांच्या गडाच्या बांधकामासाठी गोपाळ समाजाने मोठी जबाबदारी पार पाडल्याने यात्रेच्या होळीचा मान गोपाळ समाजाला देण्यात आला आहे. देवस्थानातर्फे मढी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मानाच्या पाच गोवऱ्या दिल्यानंतर मानकरी वाजतगाजत बारवेजवळ पोचले. तेथे होळी पेटविण्यात आली. या वेळी तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर उपस्थित होते. 

Web Title: Marathi news nagar news kanifnath festival yatra starts