समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी

हरिभाऊ दिघे
बुधवार, 3 जानेवारी 2018

तळेगाव दिघे (जि. नगर) - संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे बुधवारी कोरेगाव भीमा येथे आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक करण्यात आल्याच्या निषेधार्थ दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. महिला व पुरुषांनी हातात निळे झेंडे घेवून घोषणा देत चौफुली परिसरातून निषेध फेरी काढली. त्यानंतर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी दगडफेक करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

तळेगाव दिघे (जि. नगर) - संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे बुधवारी कोरेगाव भीमा येथे आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक करण्यात आल्याच्या निषेधार्थ दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. महिला व पुरुषांनी हातात निळे झेंडे घेवून घोषणा देत चौफुली परिसरातून निषेध फेरी काढली. त्यानंतर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी दगडफेक करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

तळेगाव दिघे येथे कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बुधवारी सकाळी नऊ वाजता पदाधिकारी, दलित व बहुजन कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने बुद्धविहारात जमले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महिला व पुरुषांनी हातात निळे झेंडे घेवून निषेध फेरी काढली. तळेगाव चौफुली परिसरात निषेध सभा घेण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, तळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच बाबासाहेब कांदळकर,उपसरपंच अनिल कांदळकर, बहुजन नेते अशोकराव जगताप, मार्केट कमिटीचे माजी संचालक आत्माराम जगताप, रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष रावसाहेब जगताप, माजी सरपंच प्रमिला जगताप, रामनाथ जगताप, सुभाष जगताप, विलास जगताप, बबलू जगताप, मधुकर दिघे,गणेश दिघे, संपतराव दिघे, काशिनाथ जगताप, इसाक शेख, बशीर शेख, मधुकर जगताप, राहुल जगताप,एकनाथ जगताप, नानासाहेब जगताप,राजू जगताप, प्रमोद जगताप, बबलू जगताप, सुनिता जगताप, तुषार जगताप, अनिल जगताप, मच्छिंद्र जगताप, प्रकाश जगताप, आकाश जगताप, विशाल जगताप,प्रदिप जगताप, ॠषीकेश जगताप, राजु अहिरे, दिपक जगताप, विजय जगताप, रवी जगताप, प्रमोद जगताप, मनोज जगताप, आनंद भोसले, सचिन राऊत, राहुल जगताप, निलेश जगताप, अजय जगताप, सुनील जगताप सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसंगी प्रभाकर कांदळकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, अशोकराव जगताप, रावसाहेब जगताप, मनोज जगताप यांची भाषणे झाली. कोरेगाव भीमा येथील घटनेस जबाबदार समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमोल जगताप यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक जांभूळकर, बाळासाहेब घोडे यांनी यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद शांततेत पार पडला.

Web Title: Marathi News Nagar News Koregaon Bhima rite Demand to take action