संगमनेर : महिला टी-२० संघात माया सोनावणेची निवड

Maya-sonawane
Maya-sonawane

तळेगाव दिघे (नगर) : 'बीसीसीआय'तर्फे ता. १३ ते १६ जानेवारी दरम्यान मुंबई येथे घेण्यात येणाऱ्या सिनिअर महिला टी - २० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघामध्ये चिंचोलीगुरव (ता. संगमनेर) येथील सुकन्या अष्टपैलू खेळाडू माया दत्तात्रेय सोनवणे हिची निवड झाली आहे.

माया सोनवणे हिने गेल्या महिन्यात औरंगाबाद येथे झालेल्या १९ वर्षाखालील स्पर्धेत तसेच सिनिअर महिला एकदिवसीय स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मायाने पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र संघाचे दिल्ली, हैद्राबाद, रेल्वे व मुंबई यांच्या सोबत सामने होणार आहेत. थोरात साखर कारखान्याचे संचालक हौशिराम सोनवणे यांची ती पुतणी आहे. ती सिन्नर महाविद्यालयाची एफ. वाय. बीएस्सीची विद्यार्थिनी आहे. चंदनापुरी (ता. संगमनेर) येथील क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे पाठोपाठ चिंचोलीगुरवच्या माया सोनवणे हिने महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात दणदणीत पदार्पण केले असून नगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. निवडीबद्दल मायाचे अभिनंदन होत असून तिच्या गावात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com