सासूबरोबरच्या अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्यामुळे भावाचा खून

Shrirampur
Shrirampur

श्रीरामपूर : सासूबरोबर असलेल्या अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्याच्या रागातून सख्ख्या भावाचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. धरमाडी टेकडी (ता. राहुरी) येथे झालेल्या या खून प्रकरणी आरोपी अमोल रावसाहेब शेलार (वय २८, रा. तेलगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे) याला सायबर सेलने अटक करून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

अपर पोलिस अधिक्षक रोहिदास पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उप अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सायबर सेलचे निरीक्षक सुनील पवार उपस्थित होते. पवार म्हणाले, २२ ऑक्टोबर २०१७ रोजी राहुरी-नगर रस्त्यावरील धरमाडी टेकडीजवळ एक नग्न आवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. दगडाचे चेहरा ठेचून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार दिवसांनंतर मृत व्यक्तीची ओळख पटली. किरण रावसाहेब शेलार असे त्याचे नाव असून राहुरी तालुक्यातील प्रिंप्री अवघड येथे तो एका विट भट्टीवर काम करत असल्याची माहिती मिळाली.

राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ या गुन्ह्याचा तपास करत होते. नंतर हा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला मात्र पुढे हा तपास सायबर सेलचे निरीक्षक सुनिल पवार यांनी केला. मृत किरण शेलारचे आईवडील बाभळेश्वर परिसरात राहतात. त्याचा भाऊ अमोल हा ठाणे जिल्ह्यातील तेलगाव येथे ट्रॅक्टर चालक आहे. या सर्वांचे जबाब नोंदविण्यात आले. मात्र त्यांच्याकडून काही माहिती मिळाली नाही. दरम्यान, मृत किरणचा मोबाईल धामोरी येथील एका व्यक्तीकडे मिळाला. त्याच्याकडे चौकशी केली असता एका अनोळखी व्यक्तीने पेट्रोलसाठी पैसे नसल्याचे सांगून हा मोबाईल आठशे रुपयांना विकल्याचे सांगितल्या. किरण व त्याचा भाऊ अमोल शेलार यांच्या मोबाईलचे लोकेशन व फोनकॉल्सच्या माहितीवरून अमोल दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा संशय पोलिसांना आला. 

अमोलला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. किरणच्या सासूशी असलेले अनैतिक संबंध त्याला माहिती झाले होते. तो वेळोवेळी विचारणा करून संबंधात अडसर आणत होता. २१ ऑक्टोबर रोजी आम्ही आई वडीलांकडे बाभळेश्वरला गेलो. तेथून राहूरीला आल्यानंतर दोघांनी सोबत दारू प्यायली. नंतर एक साथीदार सोबत घेऊन किरणच्या डोक्यात दगड घालून ठार मारले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यावरून आरोपी अमोल रावसाहेब शेलार याला अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com