निळवंडे कालव्यांसाठी निधी मिळवून देणार - नितीन गडकरी 

हरिभाऊ दिघे 
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

तळेगाव दिघे (नगर) : नवी दिल्ली येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत निळवंडे धरण कालव्यांच्या प्रलंबित कामास निधी मिळावा, अशी मागणी नगरच्या शिष्टमंडळाने केली. निळवंडे कालव्यासाठी निधी मिळवून देण्याची ग्वाही मंत्री गडकरी यांनी यावेळी दिली.

 निळवंडे कालव्यांना निधी मिळावा या मागणीसाठी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांच्या नेतृत्वाखाली खासदार सदाशिव लोखंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, नितीन कापसे, भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष गीते व संजय शिर्डीकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मंत्री गडकरी यांना मागणीचे निवेदन दिले. याप्रश्नी सबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत त्यांनी चर्चा केली.

मंत्री गडकरी म्हणाले, महाराष्ट्रातील जलसंधारण कामांसाठी केंद्राकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. निळवंडे कालव्यांसाठी देखील भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी जनतेला न्याय देण्याची ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिली.

Web Title: Marathi news nagar news nilwande dam donation