पंधरा हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी अटक

सूर्यकांत नेटके
बुधवार, 17 जानेवारी 2018

नगरच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात ही कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. 

नगर : पाथर्डीवरून संगमनेरला बदली करण्यासाठी तसेच निलंबन सेवा काळात बाबत निर्णय घेण्यासाठी ग्रामसेवकाकडून पंधरा हातलाच घेताना विजय निवृत्ती चराटे या विस्तार अधिकारयाला पकडले.

नगरच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात ही कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. 

लाचलूचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक शंकर कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. विस्तार अधिकारयाने घेतलेल्या पंधरा हजारापैकी दहा हजार साहेबांसाठी आहेत. त्या विस्तार अधिकारयाने तक्रार दाराकडे सांगितले होते अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोणत्या साहेबासाठी पैसे घेतले याचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Marathi news Nagar news officer arrested