नगर : पुणेवाडी गावाच्या विकासपर्वाला सुरवात - सरपंच बाळासाहेब रेपाळे

सनी सोनावळे
गुरुवार, 15 मार्च 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर) : विकासकामे आणून क्षेत्राला सुजलाम-सुफलाम करणे आमची प्राथमिकता आहे. क्षेत्रातील मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम आम्ही करीत आहोत या विकासकामांच्या माध्यामातून पुणेवाडीच्या विकासपर्वाला सुरवात झाली असल्याचे प्रतिपादन सरपंच बाळासाहेब रेपाळे यांनी केले. 

पुणेवाडी (ता.पारनेर) येथे चौदाव्या वित्त आयोगातुन जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत, स्वच्छता गृह, बंदीस्त गटार अश्या सहा लाख साठ हजार रूपयांच्या विविध विकासकांमाचे भुमिपुजन गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रभाजी पूजारी व सरपंच रेपाळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी सरपंच सुहास पुजारी, भास्कर पोटे, बाबाजी पोटे, उपसरपंच विशाल दुस्मान, संभाजी औटी, अरुण रेपाळे, गोरख पोटे, अमोल रेपाळे उपस्थित होते. रेपाळे म्हणाले,सर्वसमावेशक,स्वच्छ व पारदर्शक अश्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार आहे. शैक्षणिक दर्जा उंचविण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षकांना करतानाच भविष्यात अनेक भौतिक सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Marathi news nagar news punewadi village development