माझी लढाई देशातील शेतकरी व सामान्य जनतेच्या भल्यासाठी - अण्णा हजारे

मार्तंडराव बुचुडे
सोमवार, 12 मार्च 2018

राळेगणसिद्धी (नगर) : माझी लढाई ही फक्त राळेगणसिद्धी परीवारासाठी नसून ती संपुर्ण देशातील शेतकरी व सामान्य जनतेच्या भल्यासाठी आहे. देशात लाखो शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या थांबवयाच्या असतील तर शेतकऱ्यांना शेतीमालाल हमीभाव मिळणे व वयोवृद्ध शेतकर्यांना पेन्शन मिळणे गरजेचे आहे. तसेच देशातील भ्रष्टाचार कमी व्हावा, त्या साठी काही कायदे करावेत म्हणून मी आंदोलन करत हे त्यामुळे अता आंदोलन करणारच असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील ग्रामसभेत जाहीर केले.     

सरपंच रोहीणी गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. या वेळी अनेक ग्रामस्थांनी तुम्ही अता वाढत्या वयाच व प्रकृतीचा विचार करता आंदोलन करू नये, तसेच उपोषण तर अजिबात करू नये, तुमची आम्हाला व देशालाही गरज आहे असे मत मांडले त्यावर हजारे बोलत होते. मी समाजासाठी जगत आहे. देशातील जनता व शेतकरी सुखी झाला पाहीजे त्यासाठी शेतकर्यांना हमीभाव व पीकासाठी वैयक्तीक विमा योजना तसेच पेन्शन योजना सुरू व्हावी म्हणजे शेतकरी आत्महत्या थांबतील तसेच लोकपाल व लोकायुक्त कायदा आमलात आणावा म्हणजे देशातील भ्रष्टाचार थांबेल या प्रमुख मागण्यांसाठी आपला लढा आहे व तो लढण्याचा अता निर्धार झाला आहे.

यावेळी उद्योजक सुरेश पठारे म्हणाले, या पुर्वीच्या आंदोलनात त्या वेळच्या सरकारने फसविले व आताही हे सरकार फसवत आहे त्यासाठी आंदोलनाची गरज आहे मात्र उपोषण करू नये कारण तुमची देशाला व समाजाला गरज आहे. तसेच तुम्ही करत असलेली आंदोलणे संपुर्ण राज्यभरात एकाच वेळी होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. या वेळी सरपंच रोहिणी गाजर, उपसरपंच लाभेष औटी, सुरेश पठारे माजी सरपंच जयसिंग मापारी, गांगाभाऊ मापारी, माधव पठारे, डॉ. धनंजय पोटे, ददा पठारे, राजाराम गाजरे, अरूण बालेकर आदींनी आपली मते मांडली या सर्वांनीच हजारे यांनी उपोषणापासून दूर रहाण्याची विनंती केली.शेवटी लाभेष औटी यांनी आभार मानले.

Web Title: Marathi news nagar news ralegansiddhi anna hajare agitation