शाळेतील वर्गांचे व मंदिराच्या सभामंडपाचे अण्णा हजारेंच्या हस्ते भूमिपूजन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

सुपे : माणसे घडविण्याची व त्यांच्यात बदल करण्याची ताकद फक्त शाळा अणि मंदिर यांच्यातच आहे. देशाचा व समाजाचा विचार करणारा माणूस घडवून तो उभा करण्याचे काम शाळा किंवा मंदिरच करू शकते या दोनही ठिकाणांचा उद्देश समान आहे. जर अशी चांगल्या विचारांची माणसे या ठिकाणी दडली तर समाजाचा व देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. सुपे येथे विठ्ठल मंदिराच्या सभामंडपाचे व जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळांच्या चार वर्ग खोल्यांचे भूमिपूजन हजारे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.

सुपे : माणसे घडविण्याची व त्यांच्यात बदल करण्याची ताकद फक्त शाळा अणि मंदिर यांच्यातच आहे. देशाचा व समाजाचा विचार करणारा माणूस घडवून तो उभा करण्याचे काम शाळा किंवा मंदिरच करू शकते या दोनही ठिकाणांचा उद्देश समान आहे. जर अशी चांगल्या विचारांची माणसे या ठिकाणी दडली तर समाजाचा व देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. सुपे येथे विठ्ठल मंदिराच्या सभामंडपाचे व जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळांच्या चार वर्ग खोल्यांचे भूमिपूजन हजारे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती दिपक पवार, सरपंच भाऊसाहेब पवार, उपसरपंच राजू शेख, गट शिक्षणाधिकारी संभाजी झावरे, राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी, अंकुश वाढवणे, दिलीप पवार, मनोज बाफना, मुख्याध्यापिका नंदा अल्हाट, सचिन काळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.     

हजारे पुढे म्हणाले, समाजात देशाचा, समाजाचा विचार करणारी माणसे तयार झाली पाहीजेत. त्यासाठी मोठ्यांनी तसे संस्कार व आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. छोटी मुले मोठ्यांचा अनुकरण करतात. ही जबाबदारी प्रथम पालक व नंतर शिक्षकांची आहे. सार्वजनिक कामात गावाचा सहभाग असला पाहीजे ज्या कामात जनतेचा सहभग असतो तेथे अपुलकी तयार होऊन त्या कामाशी आपलेपणाचे नाते जोडले जाते. शिक्षक घड्याळाकडे व घराकडे पाहुन काम करतात. त्यांना या बालकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. समाजाच्या भल्यासाठी त्यागाची गरज आहे. या वेळी हजारे यांनी माजी सभापती कै. पोपटराव पवार यांच्या बद्दल गौरव उद्गार काढून त्यांचा मुलगाही त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन काम करत आहे ही बाब चांगली असल्याचेही शेवटी हजारे म्हणाले. उपसभापती पवार यांनी प्रास्ताविक व स्वगत केले तर शेवटी मार्तंड बुचुडे यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news nagar news school classrooms and temples building