पारनेर : पाणीटंचाईमुळे शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी

सनी सोनावळे
बुधवार, 7 मार्च 2018

तालुक्यातील खडकवाडी, वनकुटे, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, पोखरी, कान्हूरपठार यासह तालुक्यातील इतर भागातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन शाळेच्या वेळत बदल करुन शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात निश्चित सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे शिष्टमंडळास झावरे व ठुबे यांनी सांगितले.

टाकळी ढोकेश्वर : प्राथमिक शाळा मार्च महिना सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात भरविल्या जातात. परंतू यावर्षी राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याबाबत निर्णय घेतला. परंतू नगर जिल्हा परिषदेने याबाबत आज अखेर निर्णय न घेतल्यामुळे पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघाने इतर संघटना प्रतिनिधींसह पारनेर तालुक्याचे सभापती राहूल झावरे व जिल्हा शिक्षण समितीच्या सदस्या उज्वला ठुबे यांना निवेदन दिले.

तालुक्यातील खडकवाडी, वनकुटे, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, पोखरी, कान्हूरपठार यासह तालुक्यातील इतर भागातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन शाळेच्या वेळत बदल करुन शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात निश्चित सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे शिष्टमंडळास झावरे व ठुबे यांनी सांगितले. यावेळी तालुका संघांचे अध्यक्ष प्रविण ठुबे, आबा दळवी, सुर्यकांत काळे, संतोष खामकर, विजय काकडे उपस्थित होते.

Web Title: Marathi news Nagar news schools in Parner