छिंदमविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठराव मंजूर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. भाजप गटनेते दत्ता कावरे यांनी हा ठराव मांडला. विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी त्याला अनुमोदन दिले.

नगर : शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करून त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठराव आज (सोमवार) महापालिकेत मंजूर करण्यात आला. 

छिंदम याला सध्या न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी नाशिक जिल्हा कारागृहात करण्यात आलेली आहे. छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. भाजप गटनेते दत्ता कावरे यांनी हा ठराव मांडला. विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी त्याला अनुमोदन दिले. याबरोबरच
 देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला.

छिंदम याने महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. छिंदम याच्या प्रभागातील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी कर्मचारी पाठविले नाही या कारणावरुन फोनवर विचारणा केली. "शिवजयंती झाल्यानंतर माणसे पाठवितो'', असे बिडवे यांनी सांगितल्यावर छिंदम याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवाजी महाराज व शिवजयंतीबाबत अपशब्द वापरले. बिडवे आणि छिंदम यांच्या संभाषणाची ऑडियो क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली त्याचे पडसाद राज्यभर उमटले.

Web Title: Marathi news Nagar news Shripad Chindam crime nagar