नगर - पाथर्डीतील सुरसवाडी गाव 3 वर्षांपासून पाण्यापासून वंचित

राजेंद्र सावंत
गुरुवार, 15 मार्च 2018

पाथर्डी (नगर) : येथे सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली. विहिरीत पाणी असतानाही सुरसवाडी हे दोनशे लोकवस्तीचे गाव तीन वर्षापासुन पाण्यापासुन वंचीत आहे. एक ते दीड किलोमीटर पायपीट करुन पिण्यासाठी महिलांना पाणी आणावे लागते. सरपंच व पंचायत समितीकडे तक्रारी करुनही काहीच होत नाही. प्यायला पाणी मिळावे यासाठी कोणाकडे जावे हेच समजत नाही अशी भावना महिला बोलुन दाखवतात.

माणिकदौंडीच्या पट्ट्यात बोरसेवाडी ग्रामपंचायती अंतर्गत सुरसवाडी हे डोंगराच्या दरीतलं गाव. पन्नास उंबरा असणाऱ्या गावातील बहुतेकजण पोटासाठी सहा ते आठ महिने स्थलातंरीत होतात. महीला, वृद्ध व लहान मुले इथे राहतात. गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर आहे. गावात पाण्याची टाकी आहे. एका शेतकऱ्याने जमीन सपाट करताना गावच्या पिण्याच्या पाईपलाईनच्या काही नळ्या तुटल्य़ा. त्या नळ्या दुरुस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली. मात्र सरपंच व सर्वच सदस्य यांनी ते काम केले नाही. पंचायत समितीच्या अधिकार्यांना लेखी निवेदन दिले. तरीही काहीच झाले नाही. तीन वर्षापासुन प्यायला पाणी मिळत नाही. रोज पायपीट करावी लागते. सकाळी दोन ते तीन तास पाणी आणायचे काम करावे लागते. 

उन्हाळ्यात तर खुपच हाल होतात. पाईपलाईन दुरुस्त करुन पाणी मिळावे एवढीच अपेक्षा. कमी पट असल्याने प्राथमिक शाळा बंद झाली. शेजारच्या पवार तांड्यावर मुलांना शाळेसाठी जावं लागतं. शिधापत्रिकेवरील धान्य तीन महिने मिळत नाही. गावात सिंगल फेजची वीज नाही. आठ-आठ दिवस गाव रात्री अंधारात असते.

सरपंच व सदस्यांना सांगुनही पाणी योजनेची दुरुस्ती केली जात नाही. मतदानापुरते सर्वजण येतात. सरपंच व उपसरपंच पाथर्डीला राहतात. महिलांना पाण्यासाठी पायी एक किमी चालावे लागते, असे सुनिता अंकुश सुरासे या महिला रहिवाशाने सांगितले.

सुरसवाडी येथील दोन ग्रामपंचायत सदस्यामधे व्यक्तीगत भांडण आहे. त्यामुळे येथील पाईपलाईनच्या कामात अडचण आली होती. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतुन पाईपलाईन दुरुस्त करुन तातडीने पाणी देऊ, असे आश्वासन बोरसेवाडीच्या सरपंच स्वाती सोपान बोरसे यांनी दिले. 

Web Title: Marathi news nagar news susarwadi dry no water village