स्वित्झर्लंडच्या उपराष्ट्रपतींकडून आमदार बाळासाहेब थोरात सन्मानित

हरिभाऊ दिघे 
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

तळेगाव दिघे (नगर) : राज्याचे अभ्यासू काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री व संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाने स्विस पार्लमेंटला भेट दिली असून यावेळी स्वित्झर्लंडचे व्हा. प्रेसीडेंट ऊलीमाऊरर यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सन्मान केला.

तळेगाव दिघे (नगर) : राज्याचे अभ्यासू काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री व संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाने स्विस पार्लमेंटला भेट दिली असून यावेळी स्वित्झर्लंडचे व्हा. प्रेसीडेंट ऊलीमाऊरर यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सन्मान केला.

स्वित्झर्लंड देशाची राजधानी बर्न येथे स्विस पार्लमेंटला अभ्यास दौर्‍यासाठी आ. थोरातांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी त्यांचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. स्वित्झर्लंडचे व्हा. प्रेसीडेंट ऊलीमाऊरर व तेथील खासदार उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी स्वीस पार्लमेंटच्या कामकाजाची माहिती दिली. या दौर्‍यात महाराष्ट्राच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सदस्यांनी इंग्लंड, पॅरिस, स्वित्झर्लंड येथील संसदीय लोकशाही प्रणालीचा अभ्यास केला. तेथील कामकाज, सदस्यांचे प्रश्‍न मांडणीपध्दती, त्याचे निराकरण व कार्यवाही, लोकशाही अधिकार, व्यक्तीस्वातंत्र्य अशा वेगवेगळ्याा विषयांना अभ्यास केला. 

यावेळी शिष्टमंडळाचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी भारतातील समृध्द लोकशाहीची रचना, लोकसभा, राज्यसभा,विधानसभा व विधानपरिषद यांची कार्यप्रणाली, भारतीय राज्यघटना, भारतीय नागरीकांचे मुलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्य यांची माहिती दिली. तसेच गुंतवणूकीसाठी महाराष्ट्राची भौगोलिक अनुकलता ही या देशाच्या प्रतिनिधींना गुंतवणुकीसाठी अनुकूल असल्याचे सांगितले. जगात 1848 पासून लोकशाहीतील मतदान पध्दत अस्तित्वात आली. मात्र या प्रगत देशात महिलांना 1971 ला मतदानाचा हक्क देण्यात आला. या देशाला 200 खासदार असून 46 राज्यसभा सदस्य 7 मंत्री 1 व्हाईस प्रेसीडेंट व 1 प्रेसीडेंट अशी संसदीय रचना आहे. प्रगती,शिस्त व स्वच्छता असलेल्या या देशाकडून बरेच काही शिकण्यासारखे असून महाराष्ट्रात या देशाने गुंतवणूकीसाठी यावे अशी विनंती ही या शिष्टमंडळाने केली आहे.

Web Title: Marathi news nagar news Switzerland vice president balasaheb thorat felicitated