समान समस्यांवर आधारित तळेगाव दिघे तालुका करा

हरिभाऊ दिघे 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

तळेगाव दिघे (नगर) : सध्या नगर जिल्हा विभाजनाचे बिगुल वाजले. तळेगाव दिघे तालुक्याची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा दुष्काळी भागातील जनतेकडून व्यक्त होत आहे. संगमनेर, कोपरगाव, राहाता व सिन्नर तालुक्यातील समान समस्या असलेल्या दुष्काळपिडीत गावांचा मिळून तळेगाव दिघे तालुका करावा अशी मागणी युवक कार्यकर्ते मतीन शेख व राहुल जगताप यांनी केली आहे.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव व निमोण, कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, राहाता तालुक्यातील काकडी तसेच सिन्नर तालुक्यातील वावी परिसरातील गावे अवर्षण प्रवण क्षेत्रात आहेत. दुष्काळ सातत्यामुळे या भागात समान समस्या निर्माण झालेल्या आहेत. मात्र या चारही तालुक्यातील दुष्काळी भागाच्या विकासासाठी सरकार पातळीवर पुरेसे प्रयत्न होत नाही. त्यामुळे शेतीच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनलेला आहे.

दुष्काळी भागातील गावांचा स्वतंत्र तालुका झाल्यास या भागाच्या विकासाला चालना व गती मिळू शकेल. दुष्काळी भागातील गावांना विकासाच्या उंबरठ्यावर आणण्यासाठी स्वतंत्र तालुक्याची निर्मिती होण्याची गरज निर्माण झाली आहे. विकासासाठी छोट्या राज्यांची व जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार असेल तर त्याच धर्तीवर छोट्या तालुक्याची निर्मिती व्हावी. सध्या जिल्हा विभाजनाचे बिगुल वाजले आहे. जिल्हा विभाजन झाल्यास काही तालुक्याची निर्मिती केली जाईल.

सदर पार्श्वभूमीवर संगमनेर, कोपरगाव, राहाता व सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त ६० ते ६५ गावांचा नवीन स्वतंत्र तालुका करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. तळेगाव दिघे हे गाव संगमनेर - कोपरगाव व नांदूरशिंगोटे - लोणी या हमरस्त्यावरील चौफुलीवर आहे. दुष्काळी भागातील गावांचा तळेगाव दिघे हा स्वतंत्र तालुका करावा अशी मागणी मतीन शेख व राहुल जगताप सहित अवर्षण प्रवण भागातील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Marathi news nagar news talegao dighe differenr taluka demand