न्यू इंग्लिश स्कूलची ‘खेळताड’ प्रथम

न्यू इंग्लिश स्कूलची ‘खेळताड’ प्रथम

सातारा- शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ एनआयई’च्या वतीने झालेल्या ‘सकाळ एनआयई’ नाट्यस्पर्धेत साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलने (एकांकिका-खेळताड) पहिला क्रमांक मिळविला. साखरवाडीच्या (ता. फलटण) साखरवाडी माध्यमिक विद्यालयाने दुसरा (इस्कोट), तर साताऱ्यातील गुरुकुल इंग्लिश स्कूलने (हक्क) तिसरा क्रमांक पटकावला. सातारा एमआयडीसीतील लोकमंगल हायस्कूल (खेळ मांडियेला) आणि अनंत इंग्लिश स्कूलने (व्हॉट्‌सॲपचा तमाशा) उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली. 

‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देताच शाहू कलामंदिरात विद्यार्थी कलाकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जल्लोष केला. पारितोषिक वितरणानंतर ‘लागिरं झालं जी’मधील कलाकारांबरोबर सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली होती. श्री कैलास फूड इंडस्ट्रीज (अमृतवाडी) हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. जंगलहुड, पेस आयआयटी अँड मेडिकल सातारा आणि कणसे होंडा- ह्युंदाई हे सहप्रायोजक होते. 

जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी ही स्पर्धा खुली होती. स्पर्धेत जिल्ह्यातील १७ शाळा सहभागी झाल्या. दोन दिवस स्पर्धा सुरू होत्या. स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील बाल कलाकारांना आपल्यातील कलागुण दाखविण्याची संधी मिळाली. विविध शाळांच्या बाल कलाकारांनी कसलेल्या कलाकारांसारखा अभिनय करत रसिकांची मने जिंकली. साताऱ्यातील ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे व वनराज कुमकर यांनी परीक्षण केले. स्पर्धेतील बाल कलाकारांचे व विजेत्यांचे कौतुक करण्यासाठी खास ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकार संदीप जंगम, संतोष पाटील, रवींद्र डांगे, चित्रपट दिग्दर्शक बाळकृष्ण शिंदे, तसेच ‘पेस आयआयटी अँड मेडिकल सातारा’चे अभय टोणपे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ‘सकाळ एनआयई’चे समन्वयक विजय सुतार, ‘यिन’चे समन्वयक अभिजित बर्गे, ‘मधुरांगण’च्या सहायक व्यवस्थापक चित्रा भिसे यांनी परिश्रम घेतले. 

कलावंतांचे अनुभवाचे बोल मार्गदर्शक
‘लागिरं झालं जी’ मालिकेतील संदीप जंगम, संतोष पाटील व रवींद्र डांगे यांनी भाषणातून अनुभव सांगत बाल कलाकारांना प्रोत्साहन दिले. परीक्षक तुषार भद्रे व वनराज कुमकर यांनी लहान वयातील कलाकारांचे कौतुक करताना प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. शालेय स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी अनुभवी कलावंतांनी केलेले मार्गदर्शन व त्यांच्या उपस्थितीने स्पर्धेची रंगत अंतिम क्षणापर्यंत वाढत गेली. पारितोषिक वितरणानंतर या कलावंतांसमवेत सेल्फी काढण्याची संधी विद्यार्थ्यांसमवेत पालक व शिक्षकांसह उपस्थितांनीही सोडली नाही. त्यासाठी या कलावंतांभोवती झुंबड उडाली होती.    

स्पर्धेतील इतर विजेते (अनुक्रमे पहिले तीन)
 उत्कृष्ट दिग्दर्शन - न्यू इंग्लिश स्कूल (सातारा), साखरवाडी माध्यमिक विद्यालय (साखरवाडी), गुरुकुल स्कूल (सातारा).

 उत्कृष्ट संगीत - कन्याशाळा (सातारा), लोकमंगल हायस्कूल (नागेवाडी), लोकमंगल हायस्कूल (एमआयडीसी, सातारा).

 प्रकाश योजना - न्यू इंग्लिश स्कूल (सातारा), साखरवाडी माध्यमिक विद्यालय (साखरवाडी), लोकमंगल हायस्कूल (एमआयडीसी, सातारा).

 नेपथ्य - जिल्हा परिषद केंद्रशाळा (कुडाळ), अजिंक्‍यतारा प्राथमिक विद्यामंदिर (शेंद्रे), साधना इंग्लिश मीडियम स्कूल (सातारा).

 उत्कृष्ट अभिनेता (अनुक्रमे पहिले पाच) - इशान केसकर (न्यू इंग्लिश स्कूल), मयूरेश आरेकर (अनंत इंग्लिश स्कूल), प्रणव धायगुडे (साखरवाडी), रोहन सोडमिसे (लोकमंगल हायस्कूल, एमआयडीसी), वरद देवधर (सातारा इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा).

 उत्कृष्ट अभिनेत्री - प्राजक्ता घुगरे (कन्याशाळा, सातारा), सई जोग (बालक मंदिर), वेदिका सुर्वे (गुरुकुल स्कूल), रसिका रासकर (कुडाळ), इशा घोरपडे (निर्मला कॉन्व्हेंट).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com