घरगुती वादावरुन नवविवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मलकापूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा) - जखिणवाडी येथे नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वंदना चंद्रकांत पाटील (वय २५) असे आत्महत्या केलेल्या नव विवाहितेचे नाव आहे. 

मलकापूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा) - जखिणवाडी येथे नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वंदना चंद्रकांत पाटील (वय २५) असे आत्महत्या केलेल्या नव विवाहितेचे नाव आहे. 

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत पांडुरंग पाटील (वय २८) हे वडील पांडुरंग, भाऊ, भावजय व भावाची दोन लहान मुले असा परिवार जखिणवाडी येथे वास्तव्यास आहे. चंद्रकांत यांचे १३ ऑगस्ट २०१७ रोजी तांबवे (ता. कऱ्हाड) येथील वंदनाबरोबर रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. काही कारणाने माहेरी गेलेली वंदना पाटील रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जखिणवाडी येथे आली. आल्याबरोबरच घरात भांडणाला सुरवात झाली. कटकट व त्रास नको म्हणून पती चंद्रकांत घराबाहेर गेले. ते बराच वेळ बाहेरच थांबले. रात्री १०-३० वाजण्याच्या सुमारास घरातील सदस्यांसमोर वंदना घराच्या माडीवरील खोलीत झोपण्यासाठी गेली. त्यानंतर सर्वजण घरातील खाली असलेल्या खोल्यांमधेच झोपले. तर चंद्रकांतही खालीच झोपले. नेहमीप्रमाणे सकाळी सर्वजण उठून आपापल्या कामात होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत हे वंदनास उठवण्यासाठी माडीवर गेले असता दार आतून बंद होते. चंद्रकांत यांनी वंदनास हाका मारल्या. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून चंद्रकांत यांनी दाराच्या फटीतून आत बघितले असता वंदनाने कौलाच्या आडूला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. चंद्रकांत यांनी ही खबर तातडीने घरातील सदस्यांसह पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटस्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

Web Title: marathi news newly wed women suicide