यंदा पाऊसमान समाधानकारक - पंचागकर्ते मुकुंदराव रुईकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

ओगलेवाडी - चालू वर्षात पाऊसमान समाधानकारक असले तरी त्याच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो, असे मत कऱ्हाडचे रुईकर पंचागकर्ते मुकुंदराव रुईकर यांनी व्यक्त केले. नवीन मराठी वर्ष गुढीपाडव्यास (ता. ११) सुरू होत आहे. 

ओगलेवाडी - चालू वर्षात पाऊसमान समाधानकारक असले तरी त्याच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो, असे मत कऱ्हाडचे रुईकर पंचागकर्ते मुकुंदराव रुईकर यांनी व्यक्त केले. नवीन मराठी वर्ष गुढीपाडव्यास (ता. ११) सुरू होत आहे. 

नवीन वर्ष कसे जाणार, त्यासंबंधी त्यांनी माहिती दिली. श्री. रुईकर म्हणाले, ‘‘शेतकरी वर्गास चालू वर्ष फारसे लाभदायक दिसत नाही. पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान संभवते. फळफळावळ, भाजीपाला यांची आवक घटेल. शेतमालाचे भाव वाढले तरी वाढती मजुरी, बियाणे, खतांचे भाव यामुळे शेतकरी हवालदिल होतील. चालू वर्षाचे ग्रहमान देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून काहिसे प्रतिकूल दिसते. परस्परांत तंटे, बखेडे, दंगे या कृत्यांची प्रवृत्ती वाढेल. वर्षाचा उत्तरार्ध हा अत्यंत धकाधकीचा जाईल. बेसुमार चलनवाढ व पर्यायाने होणारी महागाई यामुळे जनता त्रस्त होईल. आर्थिक विषमता अधिक वाढेल.

सरकारला खंबीर पावले उचलावी लागतील. शिक्षणात सुधारणा होतील. काही विधायक कार्ये घडतील. खनिज तेलांच्या वापरावर बंधने येतील. सरकार तेलाचा वापर कमी करण्यास नव्या योजना आखेल. कापूस, तांदूळ, पांढरे कापड, सोने महागेल. अणुसंशोधन व अंतराळ संशोधनामध्ये भारतीय शास्त्रज्ञ प्रगती करतील. काही राष्ट्रविरोधी शक्ती डोके वर काढण्याचा प्रयत्न करतील. परंतु, जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. सरकारच्या धोरणाबाबत जनता गोंधळून जाईल. व्यापारीदृष्ट्या वर्ष मध्यम मानाचे आहे. सरकारची बंधने जाचक ठरतील. कारखानदारांना हे वर्ष सामान्य दिसते. मंदीचा त्रास जाणवेल.’’

राशीवार वर्षाचे भविष्य 
मेष - चालू वर्ष आनंददायक आहे.
वृषभ - समाधानकारक आहे.
मिथुन - प्रगतीचे जाईल.
कर्क - वर्ष संमिश्र जाईल.
सिंह - वर्ष मध्यम आहे.
कन्या - वर्ष संमिश्र आहे.
तुळ - वर्ष उत्साहाचे जाईल.
वृश्‍चिक - वर्ष जिकिरीचे जाईल.
धनू - वर्ष कष्टाचे जाईल.
मकर - वर्ष दगदगीचे व अडचणीचे आहे.
कुंभ - वर्ष प्रगतीकारक आहे.
मीन - वर्ष मध्यम व फलदायी आहे.

Web Title: marathi news ogalewadi news rain