पाकविरुद्धचा सामना पाहताना सातारकरांचा जल्लोष

सिद्धार्थ लाटकर
रविवार, 18 जून 2017

सातारा : भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान आज (रविवार) लंडन येथे चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना सुरू आहे. दरम्यान भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाल्यानंतर अझर अली 59 धावांवर खेळत असताना धावबाद झाला आणि साताऱ्यातील घराघरांमध्ये टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा जल्लोष झाला. बाजारपेठेतील दुकानांसमोर उभे राहून सामना पाहणाऱ्या चाहत्यांनीही जल्लोष केला.

संपूर्ण सातारकर आज पाकिस्तानविरुद्धच्या सामना पाहण्यात रंगून गेले आहेत. अझर बाद झाल्यानंतर चाहत्यानीं "जितेगा भाई जितेगा' अशा घोषणा दिल्या. सामन्यामुळे सातारा शहरातील रस्ते ओस पडल्याचे चित्र आहे. काही सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये युवक सामूहिकपणे सामन्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. तर शहरातील अनेक कुटुंबे यवतेश्‍वर, कास या ठिकाणच्या फार्म हाऊसवर सामन्याचा आनंद लुटत आहेत. आज घराघरांमधील रिमोटचा ताबा पतीराजांकडे असल्याचा अलिखित करार शनिवारपासूनच झाला होता. घरातील गृहिणीही सामना पाहणाऱ्या कुटुंबातील क्रिकेट चाहत्यांची फर्माईश पूर्ण करत आहेत. बाजारपेठेत ठिकठिकाणी दुकानांसमोर सातारकर सामन्याचा आनंद लुटत असून अझरची विकेट पडल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आली. जोरजोरात घोषणा दिल्यानंतर चाहते पुन्हा सामना पाहण्यात रममाण झाले.

Web Title: marathi news pakistan news satara news maharashtra news