पारनेरनच्या वैभवात वसंतरावांचा मोलाचा वाटा - शरद पवार

marathi news parner sharad pawar speech
marathi news parner sharad pawar speech

टाकळी ढोकेश्वर - पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलण्याचे व सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम करुन दुष्काळी पारनेरला वैभव मिळवून देण्यात वसंतराव झावरे यांचा मोलाचा वाटा आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. वासुंदे (ता. पारनेर) येथे माजी आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, झावरे कुटूंबाने गेल्या तीन पिढ्यांपासून समाजासाठी वाहुन घेतले आहे. झावरे यांच्या मागे सुजित व त्यांची मातोश्री सुप्रिया झावरे काम करत आहेत. 
त्यांना बळ देण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांवर आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवणुक करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांचा प्राधान्य क्रम हा वेगळा झालेला आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये एक गोष्ट चांगली असते ती म्हणजे कुटूंबप्रमुखाला शिक्षणाचे महत्व चांगले समजते. पाणी नसल्याने निसर्गाच्या लहरीपणाला तोंड द्यावे लागते. पण त्यालाही सन्मानाने तोंड द्यायचे असेल व स्वाभिमान ठेवुन जगायचे असेल तर शिक्षण प्राप्त करुन कुठेही जाऊन सन्मानाने जगता येईल अशी परिस्थिती पारनेकरांनी तयार केली. त्याचे उदाहरण म्हणजे
शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात या तालुक्यात आहे. कुटूंबाला शिक्षण देऊन शेतीकडेही लक्ष देता हा उद्देश ठेऊन सर्वांना गावाच्या जवळ येऊन नोकरी करायची असते. झावरे यांच्या बरोबरच स्व. गुलाबराव शेळके यांनीही मुंबई सारख्या ठिकाणी महानगर बँक अतिशय उत्तमरित्या चालून कष्टकऱ्यांना व्यवसायासाठी मदत करणारी हक्काची बँक उभी केली. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा उदय ही जबाबदारी सक्षमपणे सांभाळतोय. माजी सभापती स्व. पोपटराव पवार यांनीही समाजाची सेवा करण्याची भुमिका कायम ठेवली. या सर्वांनी लोकांची संबंध ठेवुन त्यांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी एक विशिष्ट राजकीय विचार की जो यशवंतराव चव्हाणांनी दिलेला हा विचार महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहु महाराज यांचा होता. तो विचार जतन करण्याचे काम झावरे यांच्याबरोबर या सर्वांनी केले. पुढच्या पिढीनेही हे काम करावे त्याची गरज आहे. 

यशवंतराव गडाख म्हणाले, वसंतराव झावरे यांनी दुष्काळीतालुक्यात पाण्याचे महत्व ओळखून पाणी अडविण्याच्या दृष्टीने मोठे प्रकल्प हे तालुक्यात केले जनतेच्या प्रश्न जाणणारे नेते होते. त्यांच्यासोबत काम करत असताना पारनेर तालुक्यातील अनेक भागात जाता आले. त्यावेळी तालुक्याविषयी कामाबद्दल असणारी तळमळ नेहमी जाणावली. मधुकर पिचड म्हणाले, आज शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणाकडे वेळ राहीला नाही. पवार यांच्याकडे आपण सर्व मोठ्या आशेने पाहत आहोत त्यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहीजे जनतेने एकच भुल कमल का फुल ही मोठी चुक केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

दिलीप वळसे पाटील म्हणाले, एका गारूड्याने डुंबरु वाजवून सांगितले की, काळा पैसा परत आणणार. शेतमालाला भाव देणार उत्पन्न वाढवणार पण प्रत्यक्षात ते खोटे ठरले. नोटबंदीसह अनेक चुकीचे धोरणे राबवुन कारखाने, उद्योगधंदे बंद पडले असून बेरोजगारी वाढली आहे. रोजगार उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना अनुसरुन कोणतेही धोरण नाही. यांचा निम्मा वेळ प्रदेशात व निम्मा वेळ पक्षाच्या प्रचारात जात आहे.
 संग्राम कोते म्हणाले, या सरकार विषयी तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हल्लाबोल यात्रेच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यावेळी चंद्रशेखर घुले, आमदार राहुल जगताप, आमदार वैभव पिचड, आमदार अरुण जगताप, संग्राम कोते पाटील, अंकुश काकडे, पोपटराव गावडे, राजश्री घुले, मंजुषा गुंड, दादाभाऊ कळमकर, आशितोष काळे, अविनाश अदिक, निर्मला मालपानी, प्रताप ढाकणे, माधवराव लामखडे उपस्थित होते.

आता नगर नव्हे सोलापूर प्रथम..
केंद्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे उसाला भाव देण्याची ताकद साखर कारखान्यांमध्ये राहिली नाही. त्यामुळे ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत. साखरेच्या उत्पादनात नगर जिल्हा अग्रभागी होता. आता सोलापुर जिल्हा पुढे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

पिकवणारा जगला नाही तर खाणाऱ्यांचे हाल होतील; शेतकऱ्यांचा सन्मान करा
उद्योगपती व कारखानदारांनी कर्ज थकविल्यामुळे बँका अडचणीत आल्या. तो तोटा भरुन काढण्यासाठी सरकारने 88 हजार कोटी बँकांना दिले. गरीब शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करतोय. त्याकडे दुर्लक्ष करुन जासक अटी टाकून फसवी कर्जमाफी या सरकारने केली पिकवणारा जगला नाही. तर खाणाऱ्यांचे हाल होतील. अशी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टिका केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com