कोठडीत पोलिसांवर बाळू खंदारेची अरेरावी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

सातारा - सुरुची बंगल्यासमोरील धुमश्‍चक्रीप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या नगरसेवक बाळू खंदारेने आज सकाळी आरडाओरडा करत पोलिस कोठडीतील पोलिसांवर अरेरावी केली. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

सातारा - सुरुची बंगल्यासमोरील धुमश्‍चक्रीप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या नगरसेवक बाळू खंदारेने आज सकाळी आरडाओरडा करत पोलिस कोठडीतील पोलिसांवर अरेरावी केली. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री झालेल्या या धुमश्‍चक्रीप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये बाळू खंदारे पसार होता. दरम्यानच्या काळात त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये शहर पोलिस त्याचा शोध घेत होते. एक महिन्यापूर्वी प्रतापगंज पेठेतील एका वकिलाच्या कार्यालयात आलेल्या खंदारेला शहर पोलिसांनी पकडले होते. 

या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या खंदारेला सोमवारी सुरुची धुमश्‍चक्रीप्रकरणी अजिंक्‍य मोहितेने नोंदविलेल्या फिर्यादीमध्ये अटक करण्यात आली. अटकेतील खंदारेला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले होते. त्यानुसार त्याची रवानगी शहर पोलिस ठाण्याजवळ असणाऱ्या कोठडीत करण्यात आली होती. आज सकाळी दहाच्या सुमारास कोठडीत असणाऱ्या खंदारेने गोंधळ घातला. "मला अंघोळ करायची आहे, बाहेर काढा,' असे जोरजोराने ओरडत खंदारेने पोलिसांवर अरेरावी करण्यास सुरवात केली. पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे पाहून त्याने आणखी जोरजोरात आरडाओरडा केला. याबाबतची माहिती पोलिसांनी शाहूपुरी पोलिस, तसेच तपासी अधिकारी निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांना दिली. त्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Web Title: marathi news police crime satara