शिवसेना सत्तेसाठी लाचार : राधाकृष्ण विखे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपशी युती न करण्याची घोषणा आज (मंगळवार) केली. शिवसेनेच्या या निर्णयावर विखे-पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. शिवसेनेने नैतिकता गमावली आहे. ज्यांनी नैतिकता गमावली, त्यांनी स्वबळावर लढण्याच्या गप्पा मारू नये. अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे.

शिर्डी : शिवसेनेने नैतिकता गमावली आहे. ज्यांनी नैतिकता गमावली, त्यांनी स्वबळावर लढण्याच्या गप्पा मारू नये, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेला लगावला. तसेच शिवसेना अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत आहे, शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, असेही ते म्हणाले.  

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपशी युती न करण्याची घोषणा आज (मंगळवार) केली. शिवसेनेच्या या निर्णयावर विखे-पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. शिवसेनेने नैतिकता गमावली आहे. ज्यांनी नैतिकता गमावली, त्यांनी स्वबळावर लढण्याच्या गप्पा मारू नये. अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे.

राज्यातील जनतेवर शिवसेनेचे बेगडी प्रेम आहे. त्यामुळे जनतेचा आता शिवसेनेवर विश्वास राहिला नाही. शिवसेना आजही सत्तेतून बाहेर पडली तर काँग्रेस निवडणुकीसाठी तयार आहे, असेही विखे-पाटील म्हणाले. 

Web Title: Marathi news politics Shivsena lost morality says radhakrushn vikhe patil