पुणे-नाशिक महामार्गावर मोटार अपघातात महिलेसह दोन ठार

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 14 जुलै 2017

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्‍यातील रायतेवाडी फाटा शिवारात कार अपघातात महिलेसह दोघे जागीच ठार झाले. गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

तळेगाव दिघे ( जि. नगर) : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्‍यातील रायतेवाडी फाटा शिवारात कार अपघातात महिलेसह दोघे जागीच ठार झाले. गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेले बबन शंकर पावसे (वय 54 रा. हिवरगाव पावसा ता. संगमनेर ) हे मोटारीने ( क्र. एमएच 17 एझेड 4278 ) संगमनेरकडून हिवरगाव पावसा येथे चालले होते. दरम्यान रायतेवाडी फाटा येथे दोन महिला रास्ता ओलांडत होत्या. या महिलांना वाचवण्यासाठी कारचे ब्रेक मारले असता बबन पावसे कारच्या काचेवर आदळले. दरम्यान रस्त्याच्याकडेच्या दुभाजकाचा फटका बसल्याने कार उलटत अपघातग्रस्त झाली. या अपघातात जबर मार लागल्याने बबन पावसे जागीच ठार झाले, तर कारची धडक बसल्याने संगीता शिवराम अगविले नामक महिला जागीच ठार झाली. पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात हलविले.

Web Title: marathi news pune news nashik news accident news