मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता

सचिन शिंदे
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

कऱ्हाड - मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामानाचा अभ्यास करणाऱ्या स्थानिक आशय मेजरमेंट संस्थेने व्यक्त केला आहे. आशय संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, बंगाल उपसागराच्या नैर्ऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अरबी समुद्र, कर्नाटक ते मालदीव परिसर भागांतही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ हवामान तयार झाले आहे. तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ढगाळ हवामानामुळे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत थंडी कमी झाली आहे, कमाल तापमान 26 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान व किमान 12 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 60 ते 90 टक्के इतकी तर दूपारची आद्रॆता 45 ते 75 टक्के च्या दरम्यान असेल. राज्यभर आकाश ढगाळ राहील. 

Web Title: marathi news rain middle maharashtra kokan marathwada