संगमनेर : वेगवेगळ्या अपघातात दोघींचा मृत्यू

हरिभाऊ दिघे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विद्या भिकराज गुंजाळ (वय ३७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 

गुंजाळ सकाळपासुन शेतात काम करित होत्या. शेतातील वायरचा त्यांना धक्का बसून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

राजापूर (ता. संगमनेर) शिवारात पतीसोबत प्रवास करीत असलेल्या महिलेचा दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडून झाला. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सरूबाई अशोक धात्रक (वय ४५, रा. विरगाव, ता. अकोले) असे महिलेचे नाव आहे. अशोक धात्रक हे राजापुर मार्गे विरगावकडे दुचाकीवरून पत्नी सरूबाई धात्रक यांना घेवुन निघाले होते. सरूबाई दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना उपचारार्थ घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

याप्रकरणांची नोंद संगमनेर शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Marathi news road accident in Sangamnear Ahmednagar