अहमदनगर जिल्ह्यातील "समृद्धी' महामार्गासाठी जमीन मोजणीचे काम पूर्ण

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 14 जुलै 2017

तळेगाव दिघे (जि. नगर) - नागपूर ते मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गासाठी (समृध्दी महामार्ग) आवश्‍यक असणाऱ्या जमिनीच्या संयुक्‍त मोजणीचे काम अहमदनगर जिल्ह्यात पुर्ण झाले आहे. आवश्‍यक असणाऱ्या खाजगी जमिनी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तळेगाव दिघे (जि. नगर) - नागपूर ते मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्गासाठी (समृध्दी महामार्ग) आवश्‍यक असणाऱ्या जमिनीच्या संयुक्‍त मोजणीचे काम अहमदनगर जिल्ह्यात पुर्ण झाले आहे. आवश्‍यक असणाऱ्या खाजगी जमिनी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने घेण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महसूल व वन विभागाच्या 25 जानेवारी 2017 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हास्तरीय मोबदला निश्‍चिती समितीने अहमदनगर जिल्ह्यतील कोपरगाव तालुक्‍यातील दहा गावांच्या जमिनीच्या दराच्या गणनेचे काम पूर्ण केले आहे. जुन्या शर्तीच्या (भोगवटादार वर्ग 1) जिरायत वर्ग 3 (आकार 2.51 ते 5.00) जमिनीच्या मुलभूत दरास (Base Rate) भूसंपादन कायद्यानुसार चारपट मोबदला रक्‍कम देय होतो. त्यानुसार मुलभूत दर जिल्हा समितीने गावनिहाय दर निश्‍चित केलेले आहेत. शासन निर्णयानुसार थेट खरेदीने द्यावयाच्या या जमिनीकरीता सदर मुलभूत दराच्या 4 पट मोबदला व त्यावर 25 टक्के वाढीव रक्‍कम याप्रमाणे एकुण 5 पट रक्‍कम देय राहील. या रकमा जिरायत जमिनीकरीता असुन हंगामी बागायतीकरीता जिरायत जमिनीच्या मोबदल्याच्या दिडपट व बागायती जमिनीकरीता जिरायत जमिनीच्या दुप्पट मोबदला देय असणार आहे. यानुसार निश्‍चित केलेल्या जिरायत वर्ग - 3 जमिनीच्या बेस दराच्या थेट खरेदीसाठी म्हणजे खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीस संमती देणाऱ्या शेतकऱ्यास 5 पट मोबदला रक्कम मिळणार आहे. अंतिम गणना करतांना त्यात बदल होऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या दरानुसार थेट खरेदीस संमती देऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली विहित नमुन्यातील संमतीपत्रे संबंधित तलाठी अथवा संवादक यांच्या मार्फत प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किंवा महामंडळाचे प्राधिकृत अधिकारी तथा कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयात दाखल करावीत, असे आवाहनही जिल्हास्तरीय मोबदला समिती तथा जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागपूर - मुंबई हा समृद्धी महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्‍यातील काही गावे येतात. जिल्ह्यातील या रस्त्याची लांबी धोत्रे ते दर्डे कोऱ्हाळे ( 29.40 किमी ) इतकी तर रुंदी 120 मीटर इतकी आहे. रस्त्याच्या आखणीत येणाऱ्या गावांची संख्या 10 इतकी आहे तर रस्त्याचे आखणीत येणाऱ्या गटांची संख्या ही अंदाजित 268 इतकी आहे. खातेदारांची संख्या 804 इतकी असून रस्त्यासाठी अंदाजित आवश्‍यक क्षेत्र हे . हे.आर. इतके आहे. त्यापैकी अंदाजित शासकीय जमीन ही 17.877 हे. आर. इतकी असून बाधित वनक्षेत्र 5.11 हे. आर. इतके आहे. यासंदर्भात भूसंचयन प्रस्तावाची सद्यस्थितीसंदर्भात प्राथमिक अधिसूचना दिनांक दि. 3 डिसेंबर 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. दहा गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून त्याची लांबी 29.4 किमी असून संयुक्त मोजणी झालेले क्षेत्र हे 359.53 हेक्‍टर इतके आहे. थेट खरेदीसाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करुन जिल्हा समितीने दर निश्‍चित केलेल्या गावांची संख्या 10 इतकी असून त्यात कोपरगाव ( जि. नगर ) तालुक्‍यातील देर्डे - कोऱ्हाळे, घारी, डाऊच खुर्द, चांदेकसारे, जेऊर कुंभारी, कोकमठाण, संवत्सर, कान्हेगाव, भोजडे आणि धोत्रे या गावांचा समावेश आहे.

समृद्धी महामार्गास तिव्र विरोध
जिरायत वर्ग - 3 जमिनीच्या निश्‍चित केलेल्या बेस दराच्या पाचपट मोबदला खरेदीस संमती देणाऱ्या शेतकऱ्यास दिला जाणार आहे. मात्र नगर व नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग जाणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांकडून जमिनी देण्यास तिव्र विरोध होत असून शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली आहे.

Web Title: marathi news sakal news samrudhi marg