ड्रायपोर्टमुळे शेतकऱ्यांसह परिसराचा विकास - खासदार संजय पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

सांगली, रांजणी (ता. कवठेमहांकाळ) - येथील शेळी-मेंढी विकास महामंडळाची जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप करणारे सध्या अडगळीत पडलेले नेते आहेत. लोकांची दिशाभूल करणारे आरोप करून राजकीय दुकानदारी चालते काय? याचा ते प्रयत्न करत आहेत, असा टोला खासदार संजय पाटील यांनी आज (ता. 25) माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते प्रकाश शेंडगे यांचे नाव न घेता त्यांना लगावला. 

सांगली, रांजणी (ता. कवठेमहांकाळ) - येथील शेळी-मेंढी विकास महामंडळाची जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप करणारे सध्या अडगळीत पडलेले नेते आहेत. लोकांची दिशाभूल करणारे आरोप करून राजकीय दुकानदारी चालते काय? याचा ते प्रयत्न करत आहेत, असा टोला खासदार संजय पाटील यांनी आज (ता. 25) माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते प्रकाश शेंडगे यांचे नाव न घेता त्यांना लगावला. 

माजी आमदार शेंडगे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रांजणी येथे उभारल्या जाणाऱ्या ड्राय पोर्टच्या (कोरडे बंदर) नावाखाली शेळी-मेंढी विकास महामंडळाची जागा हडप करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला होता. महामंडळाची आरक्षित जागा घेऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. श्री. शेंडगे यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेताना खासदार पाटील म्हणाले, अडगळीत पडलेल्या नेत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय दुकानदारी पुन्हा चालते काय? ते बघत आहेत. वास्तविक रांजणी येथे महामंडळाची 1700 एकर जागा आहे. तर 500 एकर ग्रामपंचायतीचे गायरान आहे. सदर जागेवर पुढील 25 ते 30 वर्षाचा हिशेब करुन ड्रायपोर्ट उभारले जाणार आहे. त्यासाठी प्रोजेक्‍ट रिपोर्ट बनवण्यास एजन्सी नियुक्त केली आहे. ड्रायपोर्टसाठी साधारण 200 एकर जागा लागेल. त्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष श्री. डिग्गीकर हे जानेवारी महिन्यात येऊन पाहणी करतील. शेळी-मेंढी विकास महामंडळाला माझा कोणताही विरोध नाही. 

खासदार पाटील पुढे म्हणाले, विकास करताना जाती-पातीला थारा देऊ नये अशी भूमिका आहे. परंतू या महाभागांना ते अवगत नाही. शासनाच्या जागेत ड्रायपोर्ट उभारले जाणार आहे. त्यासाठी किती जागा लागेल ते पोर्ट ट्रस्टतर्फे पाहणी केली जाईल. कोणाच्या जागेवर गंडांतर आणले जाणार नाही. आरोप करणाऱ्यांनी नेतेगिरी करु नये. जतमध्ये लोकांना भावनिक करुन ते निवडून आले. परंतू तेथे किती दिवसांनी जात होते. जतमध्ये त्यांनी काय काम केले? ते सांगावे. आम्ही जतमध्ये योजनेतून पाच ते सहावेळा पाणी दिले. लोकांना दिशाभूल करणारे आरोप त्यांनी करु नयेत. ड्रायपोर्टमुळे फळे, भाजीपाला निर्यातीची संधी परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. परिसराचा विकास होणार आहे. त्यासाठी कोणाची जागा काढून घेणार नाही. मात्र विकासाच्या आड कोणी येऊ नये.

Web Title: Marathi News Sangali News MP Sanjay Patil Dry port Farmers Development