अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणी आरोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

वरिष्ठ सीआयडी अधिकाऱयांनी आज जिल्हा न्यायालयात हे 700 पानांचे आरोपपत्र वेळेत दाखल केले. 6 नोव्हेंबरला अनिकेतचा खून झाला होता. याप्रकरणी बडतर्फ पीएसआय कामठेसह 7 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सांगली : पोलिस कोठडीत मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या आणि त्यानंतर मृतदेह जाळण्यात आलेल्या अनिकेत कोथळे खुनाचे 700 पानांचे आरोपपत्र (चार्जशीट) आज (सोमवार) जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले.

वरिष्ठ सीआयडी अधिकाऱयांनी आज जिल्हा न्यायालयात हे 700 पानांचे आरोपपत्र वेळेत दाखल केले. 6 नोव्हेंबरला अनिकेतचा खून झाला होता. याप्रकरणी बडतर्फ पीएसआय कामठेसह 7 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आज दुपारी 12 वाजता सीआयडी अधिकारी आणि पोलिसांनी 700 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात एकूण सात आरोपी असून 125 जणांची चौकशी केली आहे. यातील आणखी दोन आरोपीचा तपास सुरू असून सीआयडीचे पोलिस निरीक्षक हरीश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने हे कोथळे खुनाचे आरोपपत्र अखेर न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणात सरकारकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर कोथळे खुनाचा खटला हा फासट्रॅक कोर्टात चालणार आहे.

Web Title: Marathi news Sangli news Aniket Kothle murder case chargesheet