शासन निधींच्या रस्त्याचा दर्जाही तपासणार 

marathi news sangli news mayor government funds
marathi news sangli news mayor government funds

सांगली - महापालिकेच्या निधीतीलच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणारे शहरांमधील रस्त्यांच्या कामांची तपासणी करण्यात येईल. दोषी ठेकेदारांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असे महापौर हारुण शिकलगार यांनी आज स्पष्ट केले. दुबार कामांची निधी योग्य समन्वयाने त्याच प्रभागात खर्च करण्यात येईल. त्यासाठी सर्व नगरसेवकांची आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गटनेते किशोर जामदार उपस्थित होते. महापालिका व शासन निधीतून महापालिका क्षेत्रात सध्या रस्ते कामांचा धमाका सुरु आहे. या गर्दीत पाकिटमारी करण्याचा उद्योग काही ठेकेदारांनी आरंभला आहे. निविदेत नमूद असलेले निकष डावलून कमी जाडीचे थर टाकणे, डांबर दर्जा नसणे, गटारी मंजूर असूनही त्या न करताच रस्ते करणे असे प्रकार सुरु आहेत. काल खुद्द उपमहापौरांनी याबाबत तक्रार केली होती. हा तसेच संजयनगरातील एकच रस्ता शासन व महापालिका निधीतून करण्याचा प्रकार माजी महापौर कांचन कांबळे यांच्या प्रभागात घडला होता. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी पालिका निधीतून होणारे असे रस्ते रद्द करा असे आदेश दिले होते. आमदार सुधीर गाडगीळ यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नोंदवली होती. नगरसेवकांच्या तक्रारी ऐकून शेवटी असे प्रकार जिथे घडले असतील तेथे त्याच प्रभागात हा निधीतून अन्य रस्ते करण्याचा निर्णय झाला. ती कामे त्याच ठेकेदारांना देण्यासाठी समन्वयाने मार्ग काढला जाईल तसेच यासाठी आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे श्री पाटील यांनी स्पष्ट केले. 

शामरावनगरात ड्रेनेज कामे सुरु असल्याने तेथे रस्ते कामे करताना अडचणी उभ्या राहिल्याचे महापौरांनी मान्य केले. तथापि तेथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोन्ही निधीतून होणाऱ्या रस्त्यांची कामे मार्गी लागतील असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "मिरजेतील काही रस्त्यांबाबत तक्रारींची शहनिशा करण्यात यावी. जे चुकीचे घडले असेल त्याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार असतील. ठेकेदारांस बिले दिली असतील तर त्यांची अन्य बिले प्रशासनाने रोखावीत. कारण या रस्त्यांचा दोष दायित्व कालावधी तीन वर्षाचा आहे. पालिकेची कामे तपासली जातील त्याबरोबरच पालिका हद्दीत होणारे शासन निधीतील रस्ते कामांची तपासणीही आम्ही तज्ज्ञामार्फत करणार आहोत.'' 

महापालिकेच्या सत्तेत कॉंग्रेस असली तरी सध्या उपमहापौर गटाने सवता सुभा मांडला आहे. मिरजेतील सुरेश आवटी समर्थक तीन चार नगरसेवकांनी गैरहजेरी लावली. नायकवडी समर्थक मात्र उपस्थित होते. सुमारे 42 पैकी वीस नगरसेवक आजच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे आजच्या बैठकीस कॉंग्रेसचे किती नगरसेवक उपस्थित होते. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कामे मार्गी लावण्यासाठी काही तरी करा असे साकडे सर्वच नगरसेवकांनी घातले. त्यामुळे यापुढे शहर जिल्हाध्यक्ष पाटील, महापौर शिकलगार आणि गटनेते जामदार या तिघांनीच ही जबाबदारी खांद्यावर घेण्याचा शब्द नगरसेवकांना दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com