इचलकरंजी पालिकेच्या सरीता आवळे नव्या उपनगराध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

इचलकरंजी - येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी ताराराणी आघाडीच्या सरीता भाऊसाहेब आवळे यांची बिनविरोध निवड झाली. या पदासाठी इकबाल कलावंत व संगीता आलासे यांच्यात चुरस होती. त्यामुळे एकमत होत नसल्यामुळे शेवटच्या क्षणी सौ. आवळे यांचे नाव पुढे आले. त्यामुळे त्यांना अनपेक्षितपणे या पदावर काम करण्याची संधी मिळाली.

नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवड प्रक्रीया पार पडली. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला. सरीता आवळे यांचे पती भाऊसाहेब आवळे हे माजी नगरसेवक आहेत. गेल्या सभागृहात त्यांनी बांधकाम सभापती पदावर काम केले आहे. उपनगराध्यक्ष पदावर गेल्या अनेक वर्षानंतर महिलेला संधी मिळाली आहे.

Web Title: marathi news sarita awale municipal corporation election wins